नवी दिल्ली : Discount on iPhone 13: आयफोन खरेदी करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. मात्र बजेटमध्ये खरेदी करता येत नाही. अनेकजण नवीन आयफोन लाँच झाल्यानंतर जुने मॉडेल खरेदी करतात. तुम्ही देखील नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. आयफोनच्या टॉप मॉडेलला निम्म्या किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. iPhone 13 च्या किंमतीत कपात झाली असून, फोनला फक्त ५२,९०० रुपयात खरेदीची संधी आहे. कंपनीने iPhone 13 ला ७९,९०० रुपये किंमतीत गेल्यावर्षी लाँच केले होते. ही एक लिमिटेड टाइम ऑफर आहे. फोनवर एक्सचेंज ऑफर आणि कॅशबॅक मिळत आहे. या ऑफरविषयी जाणून घेऊया.
iStore India वर स्वस्तात मिळतोय iPhone 13
प्रीमियम Apple सेलर iStore वरून तुम्ही iPhone 13 (128GB) ला फक्त ५२,९०० रुपयात खरेदी करू शकता. फोनला खरेदी करताना एचडीएफसी क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर केल्यास ५ हजार रुपये इंस्टंट डिस्काउंटचा फायदा मिळेल. याशिवाय फोनवर १८ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा मिळतो. मात्र, ही ऑफर तुमच्या लेटेस्ट फोनच्या मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे. तुम्ही जर iPhone XR 64GB एक्सचेंज केल्यास १८ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. ही ऑफर आयफोन १३ च्या अन्य स्टोरेज व्हेरिएंटसह ग्रीन कलर व्हेरिएंटवर देखील उपलब्ध आहे. फोनचे २५६ जीबी मॉडेल ६२,९०० रुपये, ५१२ जीबी मॉडेल ८२,९०० रुपये आणि ग्रीन कलर व्हेरिएंटमध्ये iPhone 13 (128GB) ५२,९०० रुपयात उपलब्ध आहे. याशिवाय, स्टोरवर आयफोन १३ प्रो, प्रो मॅक्स, आयफोन एसई ३ आणि आयफोन १३ मिनी देखील स्वस्तात उपलब्ध आहे.
iPhone 13 चे स्पेसिफिकेशन्स
Apple iPhone 13 स्मार्टफोन दमदार फीचर्ससह येतो. यात ६.१ इंच सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले दिला आहे. फोन आयओएस १५ वर काम करतो. हा पॉवरफुल ए१५ बायोनिक चिपसेट सपोर्टसह येतो. यात १२ मेगापिक्सलचे दोन फ्रंट कॅमेरा दिले आहेत, ज्याद्वारे तुम्ही ४के व्हिडिओ काढू शकता. तसेच, १२ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देखील मिळतो. यात कनेक्टिव्हिटीसाठी ५जी, वायरलेस चार्जिंग आणि वाय-फाय ६ चा सपोर्ट मिळतो.
वाढ
[ad_2]
Source link