काॅलेजमध्ये असताना ट्रेननंही केलाय प्रवास, सांगतोय आदिनाथ कोठारे

काॅलेजमध्ये असताना ट्रेननंही केलाय प्रवास, सांगतोय आदिनाथ कोठारे

[ad_1]

मुंबई : आपण हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार्स, दिग्दर्शक यांच्या मुलांबद्दल नेहमीच पाहत असतो, वाचत असतो. आजकाल तर सोशल मीडिया प्रभावी झाल्यापासून कुठल्याही स्टारला मुल झालं, की मग त्याच्या पहिल्या टॅह्यापासून ते रांगू लागलं, चालू लागलं असे फोटो किंवा व्हिडिओ झळकत असतात. त्यांना स्टार किड म्हटलं जातं. फोटोग्राफर्स त्यांच्या मागेच असतात. पण मराठीत वेगळं चित्र दिसत आलंय आणि आजही दिसतंय.

मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला लेकीचा फोटो, चाहत्यांकडून लाइक्सचा वर्षाव

भारतीय टुरिंग पार्टी म्हणजेच bha2pa च्या इन्स्टाग्रामवर या संदर्भातच आदिनाथ कोठारेचा इंटरव्ह्यू घेतलाय. त्याला विचारलंय की महेश कोठारे हे मोठे निर्माता, दिग्दर्शक. मग त्यांचा मुलगा म्हणून मोठा होताना हे वेगळेपण जाणवलं का? तुला त्यांच्या सावलीत राहावं लागलं का? यावर आदिनाथ म्हणाला आहे, ‘माझ्या घरात वातावरण खूप वेगळं आहे. मी जरी एका मोठ्या निर्माता, दिग्दर्शकाचा मुलगा असलो तरी मला तसं कधी जाणवू दिलं नाही. शाळेत असताना तर माझ्या ते लक्षातही यायचं नाही.’

आदिनाथनं काॅलेजला जाताना अनेकदा ट्रेनही पकडली आहे. तो पुढे सांगतो, ‘आमचा सगळा फोकस जरी एन्टरटेन्मेंट असला, तरीही घरचं वातावरण नाॅन फिल्मी होतं. त्यामुळे माझे वडील मोठे निर्माता, दिग्दर्शक आहेत याचा नात्यात काही फरक पडला नाही.’ शिवाय आदिनाथ म्हणाला की तू यातच करियर करावंस, अशी कुणी माझ्यावर जबरदस्ती केली नाही. ‘मला हवं ते करायची मुभा होती. अर्थात, हे पाणी चाखल्यावर मी अजून वेगळं काय करणार?’

दीपिकाच्या खोट्या आईला दाखवणार घराबाहेरचा रस्ता, कार्तिकनं लढवली

सध्या आदिनाथने एक नव्या निर्मिती संस्थेची स्थापना केली आहे. त्यानं त्याचं युट्यूब चॅनेलही सुरू केलं. तो आता लवकरच मराठी सिनेमाची निर्मिती करणार आहे.

‘चंद्रमुखी’पासून उर्मिलापर्यंत बोलला आदिनाथ कोठारे…

[ad_2]

Source link