[ad_1]
आयएएफ एएफसीएटी भरती २०२२ साठी अर्ज इच्छुक आणि पात्र उमेदवारांना (IAF AFCAT Recruitment 2022) अधिकृत वेबसाइट afcat.cdac.in वर जाऊन अर्ज करता येणार आहे. या अर्ज प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. या पदभरतीअंतर्गत एकूण २८३ पदे भरली जाणार आहेत.
IAF AFCAT Recruitment 2022: महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात तारीख – ०१ जून
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जून
IAF AFCAT Recruitment 2022: रिक्त जागांचा तपशील
एकूण पदांची संख्या – २८३
वयोमर्यादा
फ्लाइंग ब्रांच- उमेदवारांची वयोमर्यादा २० ते २४ वर्षांच्या दरम्यान असावी.
ग्राउंड ड्युटी (तांत्रिक/नॉन-टेक्निकल) शाखा- उमेदवारांची वयोमर्यादा २० ते २६ वर्षांच्या दरम्यान असावी.
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.
या पदासाठी इच्छुक उमेदवारांना ३० जूनपर्यंत आपले अर्ज पाठविता येणार आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
थेट लिंकवरुन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
[ad_2]
Source link