आधी राजू शेट्टींना खेटून उभे राहिले, मग हळूच काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काढता पाय घेतला

आधी राजू शेट्टींना खेटून उभे राहिले, मग हळूच काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काढता पाय घेतला

सांगली : एका बाजूला काँग्रेसचे (Congress) माजी मंत्री दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे नेते आणि मध्ये राजू शेट्टी… (Raju shetti) प्रसारमाध्यमांना मुलाखत देण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आजूबाजूला ही परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र राजकीय प्रश्नाला सुरुवात झाली आणि राजू शेट्टी यांना आपण सगळयाच पक्षांपासून चार हात लांब असल्याचे सांगितले. हे ऐकताच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शेट्टी यांच्यापासून हळूच काढता पाय घेतला. कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी येथे हे चित्र पाहायला मिळाले. (Raju Shetty has said that he is 4 hands away from all political parties)

एका बैलगाडी शर्यतीच्या निमित्ताने माजी खासदार राजू शेट्टी, कॉंग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, तासगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश पाटील हे कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी येथे एकत्र आले होते. या बैलगाडी शर्यतीच्या निमित्ताने प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी राजू शेट्टी यांच्या मुलाखतीसाठी पुढे सरसावले. तिथे उपस्थित असणारे काँग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील राजू शेट्टी यांच्या उजव्या बाजूला थांबले. तर, त्यांच्या डाव्या बाजूला राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाटील थांबले बैलगाडी शर्यतीवर प्रतिक्रिया दिली.सुरेश पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिल्यानंतर शेट्टी यांना राज्यसभेबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना आता सगळया पक्षांपासून चार हात लांब आहे, असे सांगितले. शेट्टी यांची ही प्रतिक्रिया ऐकून आजूबाजूला असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या. यानंतर शेट्टी यांना विधान परिषद निवडणुकीबाबत प्रश्न विचारण्यात आला.राजू शेट्टी यांचे रोखठोक विधान लक्षात घेऊन, शेट्टी यांच्या उजव्या बाजूला असणारे माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी मिश्किलपणे हसत बाजूला होणे पसंत केले आणि त्या ठिकाणी त्यांनी काँग्रेसचे दुसऱ्या फळीतील नेते येथे जितेश कदम यांना उभे केले. तर, पाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाटील यांनीही राजू शेट्टींनी राज्य सरकारवर टीका करताच काढता पाय घेतला.

[ad_2]

Source link

‘राजसाहेबांचा आदेश प्रमाण’, मनसे आमदार राजू पाटील यांचं ट्विट, राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम

‘राजसाहेबांचा आदेश प्रमाण’, मनसे आमदार राजू पाटील यांचं ट्विट, राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम

डोंबिवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) हे नॉट रीचेबल असल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी ट्विट करुन भूमिका मांडली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा आदेश प्रमाण आहे, असं राजू पाटील यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. राज्यसभा निवडणुकीच्या निमित्तानं राज्याचं राजकीय वातावरण तापलं आहे. महाविकास आघाडी आणि भाजपकडून अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करुन त्यांना आपल्या सोबत राहण्यासाठी विनंती करत आहेत. सहा जागांसाठी सात उमदेवार रिंगणात असल्यानं एका मताला देखील महत्त्व प्राप्त झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलीय आता निर्णय मनसेप्रमुख राज ठाकरे घेणार आहेत.

राज ठाकरे निर्णय घेणार
मनसे आमदार राजू पाटील यांनी “चिंता नसावी, आमच्यासाठी मा. श्री.राजसाहेबांचा आदेश प्रमाण आहे. आणि मी माणूस आहे, घोडा नाही”, असं म्हणत मनसे कुणाला पाठिंबा देणार हे राज ठाकरे ठरवतील असं म्हटलंय. त्यामुळं मनसे राज्यसभा निवडणुकीत कुणाला मत देणार हे १० जून रोजी स्पष्ट होईल.राज्यसभा निवडणुकीसाठी जुळवाजुळव सुरु

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळव सुरु झाली आहे. महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांकडून अपक्षांच्या मनधारणीचे प्रयत्न सुरु झाले आहेत. मविआ आणि भाजप अपक्षांनी आपल्याला मदत करावी म्हणून प्रयत्न करत आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार असल्यानं निवडणूक लागली आहे. भाजपनं राज्यसभेसाठी तीन उमेदवार दिले आहेत त्यामध्ये पियूष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांचा समावेश आहे. तर, शिवसेनेचे संजय राऊत, संजय पवार, काँग्रेसचे इमरान प्रतापगढी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यांच्यापैकी सहा उमदेवार खासदार होतील, तर एका उमेदवाराचा पराभव होईल. राज्यसभा निवडणुकीचा निकाल अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मतांवर ठरणार आहे.


एक एक मत महत्त्वाचं

राज्यसभा निवडणूक महाविकास आघाडी आणि भाजपनं प्रतिष्ठेची केली आहे. बिनविरोध निवडणूक करण्याचे प्रस्ताव देखील दोन्ही बाजूंनी फेटाळले गेले आहेत. त्यामुळं राज्यसभा निवडणुकीत एका मताला देखील महत्त्व प्राप्त झालंय.

[ad_2]

Source link

आमदार राजू पाटील नॉट रीचेबल…. मनसेचे एकमेव मत कुणाला? चर्चांना उधाण

आमदार राजू पाटील नॉट रीचेबल…. मनसेचे एकमेव मत कुणाला? चर्चांना उधाण

राज्यसभा निवडणुकीच्या निमित्तानं छोटे पक्ष आणि अपक्षांचं महत्त्व वाढलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नॉट रीचेबल झाले आहेत.

Raju Patil
राजू पाटील

हायलाइट्स:

  • मनसे आमदार राजू पाटील नॉट रीचेबल
  • मनसेचं मत कुणाला?
  • राज्यसभा निवडणुकीत प्रत्येक महत्वाचं

डोंबिवली : राज्यसभा निवडणुकीसाठीच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आल्याने छोट्या पक्षांचा आणि अपक्ष आमदारांचाही भाव चांगलाच वाढला आहे.यात आता मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील (Raju Patil) यांच्याही मत मोलाचे ठरले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी बोलून हे मत भाजप खेचणार की ठाणे मधील शिवसेनेचा बडा नेता पाटलांना गळाला लावणार अशी चर्चा राज्यकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान मनसे आमदार राजू पाटील हे नॉट रीचेबल झाले आहेत.

मनसे भाजप जवळीक वाढली?
मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा जोरदार उचल्याने भाजप – मनसे नेत्यांच्या जवळीक वाढल्याचे आपण पाहिले आहे. काही दिवसांपूर्वी मनसेच्या आमदार पाटील यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थनार्थ पुढाकार घेतलेला दिसला होता.तर दुसरीकडे ठाणे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे नेते राजू पाटील यांचे सुद्धा संबंध चांगले आहेत, असे असेल तरी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि मनसेचे आमदार पाटील हे कट्टर राजकीय विरोधक असल्याचे दिसून आले आहे.

कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेने भाजप आणि मनसेला खिंडार पाडलं आहे.राज्यात केडीएमसी ही एकमेव पालिका होती, जिथे दोन आकडी नगरसेवक मनसेचे होते.दरम्यान, महापालिका निवडणुक जवळ आली असल्याने शिवसेनेच्या उमेदवाराला मनसे पाठिंबा देण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे भाजपसाठी मनसेचे एक मत मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप मनसेने याविषयी भूमिका जाहीर केली नसली तरी भाजपला त्या मताची आशा आहे.

महापालिका निवडणुकीत मनसे आणि भाजप अशी युती होणार असल्याची चर्चा होत असते. त्याची चुणूक राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाच्या निमित्ताने दिसून येईल का हे पाहावे लागेल. याबाबत मनसेच्या आमदार राजू पाटील यांना सम्पर्क केला असता झाला नाही,ते नॉट रीचेबल आहेत.त्यामुळं ते कोणाला मतदान करणार हे पाहावे लागेल.

राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल अपक्षांच्या हाती
महाराष्ट्रातील सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. भाजपकडून पियूष गोयल, डॉ. अनिल बोंडे, धनंजय महाडिक, शिवसेनेचे संजय राऊत, संजय पवार, काँग्रेसचे इमरान प्रतापगढी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल यांच्यापैकी सहा उमदेवार खासदार होतील, तर एका उमेदवाराचा पराभव होईल. राज्यसभा निवडणुकीचा निकाल अपक्षांच्या मतांवर ठरणार आहे.

[ad_2]

Source link

मशिदीवरील भोंग्यांबाबत सामान्य माणसांसाठी ३ सूचना, राज ठाकरेंचे पत्र जसेच्या तसे

मशिदीवरील भोंग्यांबाबत सामान्य माणसांसाठी ३ सूचना, राज ठाकरेंचे पत्र जसेच्या तसे

[ad_2]


मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यासंदर्भात आक्रमक भूमिका घेत हा विषय कायमचा निकाली काढण्याचा निश्चय केला आहे. त्यासाठी सभांनंतर आता राज ठाकरेंनी थेट राज्यातील जनतेला आवाहन करणार पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी राज्यातील जनतेला तीन सूचना केल्या आहेत. तसेच, एक सुजाण नागरिक म्हणून या सूचनांचे पालन आपण केले, तर भोंग्यांचा हा प्रश्न आपल्याला कायमचा निकाली काढता येईल, असं आवाहनही राज ठाकरेंनी केलं आहे.

राज ठाकरेंच्या तीन सूचना काय?

१. जिथे-जिथे आवाजाच्या नियमाचे पालन होत नसेल तिथे-तिथे तुम्ही स्वाक्षरी मोहीम राबवून स्थानिक पोलिसांना कळवावे.
२. लाऊडस्पीकरच्या आवाजाचा त्रास झाल्यास तुम्ही घरातूनच स्वतःच्या मोबाईलवरून १०० क्रमांक डायल करून पोलिसांना सतत माहिती देऊ शकता.
३. माझं हे पत्र घेऊन तुमच्या घरी येणारा माझा जो महाराष्ट्र सैनिक आहे, त्याचं नाव आणि मोबाईल क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. कोणत्याही संकटात, अडीअडचणीच्या वेळी माझा हा महाराष्ट्र सैनिकच तुमच्यासाठी धावून येईल.

हेही वाचा -मशिदीवरील भोग्यांविरोधातील आंदोलन यशस्वी कसं करायचं?, राज ठाकरेंचा मनसैनिकांना मंत्र

राज ठाकरे यांचे पत्र जसेच्या तसे…

महाराष्ट्रातील माझ्या बंधू, भगिनी आणि मातांनो, सस्नेह जय महाराष्ट्र!

मशिदींवरील भोंगे काढण्यात यावेत ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती आणि भोंगे उतरवण्यासाठी चार मेचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर इतिहासात पहिल्यांदाच मशिदीवरचे भोंगे उतरले, पहाटेच्या अजान बंद झाल्या, दिवसभरातल्या बांगा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या नियमांनुसार कमी आवाजात होऊ लागल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील ९२ % मशिदीमध्ये मनसेच्या आंदोलनानंतर हा परिणाम दिसून आला. भोंगे उतरवा ही मागणी काही नवीन नव्हे. स्वातंत्र्योत्तर काळात अनेकांनी ही मागणी केली, परंतु त्यावर कुणालाही उत्तर सापडले नाही. अनेकजण न्यायालयांत गेले. त्यावर काही उच्च न्यायालयांनी भोंग्यांविरोधात कारवाई करा असं सांगितलं. तर सर्वोच्च न्यायालयाने भोंग्यांमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाच्या त्रासाची दखल घेत डेसिबलची मर्यादा घातली. तरीही देशभरात भोग्यांचा धुमाकूळ सुरूच होता.

अखेर, “लाऊडस्पीकरवरची तुमची अजान, बांग थांबली नाही तर आम्ही लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावू” असं आम्ही ठणकावून सांगितल्यानंतर चित्र बदललं. सर्वात महत्वाचं म्हणजे, आमचा हा पर्याय समस्त हिंदू बांधवांना भगिनींना आवडला. म्हणून तर ‘भोंगे हटवा’ विचाराचं लोण देशविदेशात पसरलं. त्यामुळेच राज्यातील, देशातील यंत्रणांना भोंग्यांबाबत गांभीर्यान विचार करण्याची वेळ आली. त्याचा परिणामही आपल्या सर्वांना लगेच दिसून आला. उत्तरप्रदेशात योगींच्या सरकारनेही हजारो मशिदीवरचे भोंगे उतरवले.

माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी राज्यभरात असंख्य ठिकाणी आंदोलन केले. राज्य सरकारने माझ्या २८,000 महाराष्ट्र सैनिकांना नोटिसा बजावल्या, अनेकांना अटक केली, तर अनेकांना तडीपारी लावली. या देशाचं दुर्दैव हेच की, या देशात नियम मोडणाऱ्यांना सर्व मोकळीक मिळते, परंतु नियम पाळण्याचा आग्रह धरणाऱ्यांना शिक्षा होते. असो. एक लक्षात घ्या, ‘भोंगे हटवा’ हे आंदोलन थांबलेलं नाही. आपणा सर्वांच्या आशीर्वादाने हे आंदोलन चालूच राहील. या आंदोलनाला तुमचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हातभारही असायलाच हवा.

एक सुजाण नागरिक म्हणून पुढील सूचनांचे पालन आपण केले तर भोंग्यांचा हा प्रश्न आपल्याला कायमचा निकाली काढता येईल. तुम्हा काहीजणांना कदाचित ह्याचा थेट त्रास होत नसेलही. पण, तुम्ही त्याबाबत इतरांनाही सांगू शकता.

१.सर्वोच्च न्यायालयाने लाऊडस्पीकरच्या आवाजाची सांगितलेली मर्यादा लोकवस्ती असलेल्या भागासाठी म्हणजे तुम्ही-आम्ही राहतो त्या परिसरासाठी जास्तीत जास्त ४५ ते ५५ डेसिबल (स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या मिक्सरचा आवाज) इतकी आहे. तुमच्या घराजवळच्या लाऊडस्पीकरचा आवाज इतकाच असला पाहिजे. जिथे-जिथे या नियमाचे पालन होत नसेल तिथे तिथे तुम्ही स्वाक्षरी मोहीम राबवून स्थानिक पोलिसांना कळवावे. लक्षात असू द्या की, तुम्ही जेव्हा अशा प्रकारची गोष्ट पोलिसांना कळवता तेव्हा तम्ही लाऊडस्पीकरशी संबंथित लोकांविरोधात तक्रार करत नसता किंवा गुन्हा दाखल करत नसता. तुम्ही फक्त कळवत असता आणि संबंधितांवर राज्यशासनाच्या (State) वतीने पोलीस गुन्हा दाखल करत असतात आणि पुढील कार्यवाही करण्याची जबाबदारी पोलिसांचीच असते. तुम्ही कळवल्यानंतरही पोलिसांकडून कायद्याचे पालन झाले नाही तर संबंधित पोलीस अधिकान्यावर न्यायालयाचा अवमान (Contempt of court) केल्याचा ठपका लागू शकतो.

२. लाऊडस्पीकरच्या आवाजाचा त्रास झाल्यास तुम्ही घरातूनच स्वतःच्या मोबाईलवरून १०० क्रमांक डायल करून पोलिसांना सतत माहिती देऊ शकता. पोलिसांना ट्विटर आणि फेसबुकवर टॅग करूनही तुम्ही ही माहिती देऊ शकता. कोणत्याही प्रकारे तुम्ही पोलिसांकडे तक्रार केली तर त्या तक्रारीची नोंद स्वतकडे ठेवायला विसरू नका.

३. सर्वात महत्वाचं. माझं हे पत्र घेऊन तुमच्या घरी येणारा माझा जो महाराष्ट्र सैनिक आहे, त्याचं नाव आणि मोबाईल क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. कोणत्याही संकटात, अडीअडचणीच्या वेळी माझा हा महाराष्ट्र सैनिकच तुमच्यासाठी धावून येईल. आम्हाला याची पूर्ण कल्पना आहे की, महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून पाणीटंचाई, शेतकरी आत्महत्या, अपुया शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा अशा अनेक प्रश्नांमुळे गोंधळ उडालेला आहे. पेट्रोल-डिझेलचे गगनाला भिडलेले भाव आणि महागाई यांमुळे तर जनता होरपळली आहे. बेरोजगारीचा प्रश्न तर दिवसेंदिवस राक्षसीरूप धारण करताना दिसत आहे. हे सर्व प्रश्न गंभीर आहेतच; पण त्याचबरोबर आपल्या मानसिक आणि सामाजिक शांततेचा विषयही तितकाच महत्त्वाचा आहे, हे विसरून चालणार नाही. जसा हा भोंग्यांचा विषय आपण सर्वांनी मिळून सोडवला तसेच हे इतर प्रश्नही आपण हातात हात घालून एकत्रितपणे सोडवू, असा मला विश्वास आहे. एकदाचा या विषयाचा तुकडा पाडूनच टाकूया!

धन्यवाद.

हेही वाचा – मशिदीवरील भोंग्याचा कायमचा निकाल लावायचाय, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश

मी उंदीर नाही, महाराष्ट्रात नेहमी जातो आणि पुन्हा जाणार; बृजभूषणचं मनसेला खुलं आव्हान

[ad_2]

Source link

मशिदीवरील भोग्यांविरोधातील आंदोलन यशस्वी कसं करायचं?, राज ठाकरेंचा मनसैनिकांना मंत्र

मशिदीवरील भोग्यांविरोधातील आंदोलन यशस्वी कसं करायचं?, राज ठाकरेंचा मनसैनिकांना मंत्र

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवर भोंगे उतरवण्यासंदर्भात मनसेच्या कार्यकर्त्यांना नवा मंत्र दिला आहे. मशिदीवर भोग्यांचा विषय कायम संपवण्यासाठीचं आंदोलन कसं यशस्वी करायचं यासंदर्भात राज ठाकरेंनी एक मंत्र त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. यानुसार राज ठाकरेंचा पत्राद्वारे आंदोलनाला लोकांचं पाठबळ मिळवण्याचा प्रयत्न आहे.

राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय सांगितलं?
राज ठाकरेंनी ट्वीट करुन मनसे कार्यकर्त्यांना ते वास्तव्यास असलेल्या ठिकाणच्या लोकांपर्यंत ते पत्र पोहोचवायचं असल्याचे आदेश दिले आहेत. राज ठाकरेंनी त्यांचं पत्र कार्यकर्ते वास्तव्यास असलेल्या परिसरातील घराघरात नेऊन द्यावं, अशा सूचना दिल्या आहेत. व्यापक लोकसभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही,असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंचं पत्र

माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो,

मशिदींवरील भोंग्यांच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात घातल्यानंतर राज्यातलंच नव्हे तर देशातलं राजकारण ढवळून निघालं. आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच हवा. म्हणूनच माझं एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा.

तुम्ही एकच करायचं आहे माझं पत्र तुम्ही राहता त्या परिसरातील – घराघरात स्वतः नेऊन द्यायचं आहे कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही..

राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिवाजी पार्कवरील सभेत मशिदीवरील भोंगे उतरवण्याची भूमिका मांडली होती. राज ठाकरेंनी त्यानंतर ठाणे, औरंगाबाद आणि पुणे येथे सभा घेत भूमिका स्पष्ट केली होती. मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी मनसेकडून ४ मे चा अल्टिमेटम देण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणं रात्री १० ते सकाळी ६ दरम्यान वाजणारे भोंगे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, मनसेनं सर्व मशिदींवरील भोंगे उतरवण्याची मागणी केली आहे. पुण्यातील सभेत राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेला एक पत्र लिहिणार असून ते त्यांच्या पर्यंत पोहोचवावं, अशा सूचना दिल्या होत्या.

[ad_2]

Source link

राज ठाकरेंना कोरोनाने दुसऱ्यांदा गाठलं, पायावरची शस्त्रक्रिया लांबणीवर

राज ठाकरेंना कोरोनाने दुसऱ्यांदा गाठलं, पायावरची शस्त्रक्रिया लांबणीवर

मुंबई : पायाच्या शस्त्रक्रियेसाठी लीलावती रुग्णालयात दाखल झालेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांना कोरोनाची लागण (Raj thackeray Covid Positive) झाल्याची माहिती आहे. शस्त्रक्रियेपूर्वी कराव्या लागणाऱ्या तपासण्यांतून त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या पायावरची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. १ जून रोजी त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया होणार होती.

राज ठाकरे यांनी गेल्या तीन-चार दिवसांपासून पक्षातील नेत्यांच्या बैठका घेतल्या होत्या. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध नेत्यांशी वन टू वन बातचित करत त्यांना सूचना केल्या होत्या. तसेच वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संबोधितही केलं होतं. त्यानंतर आज ते लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल झाले. तत्पूर्वी शस्त्रक्रियेपूर्वीच्या तपासण्यांतून त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे.


गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्या पायाच्या जुन्या व्याधीने डोके वर काढले होते. राज ठाकरे हे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, पायाचे दुखणे बळावल्याने त्यांना अयोध्या दौरा रद्द करावा लागला होता. त्यानंतर राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया होणार असल्याचं निश्चित झालं होतं. उद्या ही शस्त्रक्रिया होणार होती. मात्र आता कोरोनातून सावरल्यानंतर शस्त्रक्रिया करणार येईल, अशी प्राथमिक माहिती मिळतीये.


कोविड डेड सेलमुळे ॲनेस्तेशिया देऊ शकत नसल्यामुळे लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी दिली आहे.

राज ठाकरे यांना याअगोदरही कोरोनाची बाधा

राज ठाकरे यांना याअगोदरही कोरोनाची बाधा झाली होती. २३ ऑक्टोबर २०२१ रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. पहिल्यांदा राज यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे यांना कोरोनाची बाधा झाला. त्यानंतर राज यांच्या भगिनीला कोरोनाने ग्रासलं आणि नंतर स्वत: राज ठाकरे यांना देखील कोरोनाने गाठलं. सौम्य लक्षणे असल्याने राज यांनी त्यावेळी घरीच उपचार घेतले होते.

[ad_2]

Source link

‘राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये संजय राऊतांनी आग लावली’

‘राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये संजय राऊतांनी आग लावली’

कोल्हापूर : भाजपचे आमदार नितेश राणेंनी पुन्हा एकदा संजय राऊतांवर गंभीर टीका केली आहे. ‘संजय राऊतांचा घर फोडण्याचा इतिहास आहे, त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये भांडणं लावली. पण आता राऊतांची मजल थेट छत्रपतींचं घर फोडण्यापर्यंत गेली’ अशी गंभीर टीका नितेश राणेंनी केली आहे.

खरंतर, शिवसेनेकडून संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याच्या मुद्द्यावरुन वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. याच मुद्द्यावरून नितेश राणेंनी टीका केली आहे.


‘राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये भांडणं लावण्यामध्ये ज्या लोकांचा हात होता. त्यामध्ये राऊतांचाही समावेश आहे. संजय राऊतांचा घर फोडण्याचा इतिहास आहे. राज ठाकरेंनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा राऊतांची गाडी फोडण्यात आली होती. त्यावेळी असं का झालं कारण राऊतांनीच दोन्ही भावांमध्ये भांडणं लावली’ अशी टीका नितेश राणेंनी केली आहे.

पुढे बोलताना निलेश राणेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचाही उल्लेख केला. ‘असंख्य वेळा बाळासाहेब ठाकरेंनी याचा उल्लेख त्यांच्या भाषणामध्ये केला, की आमच्या घरामध्ये आग लावली जात आहे’ असंही टीका करताना नितेश राणे म्हणाले.

[ad_2]

Source link

माध्यमांचे एका रांगेत कॅमेरे पाहून राज ठाकरे म्हणाले, ऑस्ट्रेलियाने अशीच फिल्डिंग लावली होती!

माध्यमांचे एका रांगेत कॅमेरे पाहून राज ठाकरे म्हणाले, ऑस्ट्रेलियाने अशीच फिल्डिंग लावली होती!

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी राज ठाकरे पदाधिकाऱ्यांची शाळा घेतली. पक्षाचे अधिकृत प्रवक्तेच सोशल मीडियावर पक्षाची बाजू मांडतील, बाकीच्यांनी नसते उद्योग करु नका, अशा शब्दात राज यांनी पदाधिकाऱ्यांना दम भरला. तत्पूर्वी राज यांचं सभागृहाच्या बाहेर आगमन होताच प्रसारमाध्यमांचे कॅमेरे त्यांची छबी टिपण्यासाठी सज्ज होते. पण आज माध्यमांच्या कॅमेरामन आणि फोटोग्राफर्सनी राज ठाकरेंना गराडा न घालता एका रांगेत कॅमेरे लावून त्यांचे फोटो, व्हिज्युअल्स घेतले. एरवी गडबड करणारे कॅमेरामन, पत्रकारांचा शिस्तबद्ध पाहून राज ठाकरेही भारावले. ऑस्ट्रेलियाने अशीच फिल्डिंग लावली होती, असं मिश्किल कमेंट त्यांनी केली.

मुंबईतील वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात मनसेचा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संबोधित केलं. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पदाधिकाऱ्यांची शाळा घेतली. कुणीही सोशल मीडियावर भूमिका मांडणार नाही. पक्षाचे अधिकृत प्रवक्तेच सोशल मीडियावर पक्षाची भूमिका मांडतील. इतरांनी पक्षाची भूमिका म्हणून कुठेही काही बोलू नये, असा दमच राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांनी भरला.

तत्पूर्वी राज ठाकरे यांचं रंगशारदा सभागृहाबाहेर दुपारी ४ वाजताच्या सुमारास आगमन झालं. त्यांच्या सोबत मनसे नेते बाळा नांदगावकर होते. राज ठाकरेंना गाडीतून खाली उतरताच एका रांगेत लावलेले कॅमेरे दिसले. शिस्तबद्ध लावलेले कॅमेरे पाहून राज ठाकरेंनी मिश्किल कमेंट केली. अशी फिल्डिंग ऑस्ट्रेलियाचा संघ लावायचा, असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंची मिश्किल कमेंट ऐकून बाळा नांदगावकर देखील मनमुराद हसले. तसेच आपला सतत पाठलाग करणाऱ्या माध्यमांना पाहून, माझ्या पायाचे-बोटांचे फोटो घ्यायचेत का? असंही राज ठाकरे यांनी विचारलं.‘आज आयोजित केलेला मेळावा पदाधिकाऱ्यांसाठी होता. लवकरच सर्व नेते मंडळीच्या राज्यभर दौरा चालू होणार आहे. सरचिटणीस आणि उपाध्यक्ष राज्यभर दौरा करणार आहे. राज्यभर दौरा सुरु असताना राज्यभरात सदस्य नोंदणी केली जाणार आहे’, अशी माहिती मेळाव्यानंतर बाळा नांदगावकर यांनी दिली.

“राज ठाकरेंनी पुण्याच्या सभेत जाहीर केल्याप्रमाणे एक पत्र देणार आहे. ते पत्र प्रत्येक कार्यकर्ता घरोघरी जाऊन देणार आहे. हे पत्र मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषेत आहे. हे पत्र तयार झाले आहे. लवकरत ते कार्यकर्त्यांना देण्यात येणार आहे. तसेच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना जबाबदारी दिली जाणार आहे”, असंही त्यांनी सांगितलं.

[ad_2]

Source link

मनसेच्या मुंबईतील मेळाव्याला वसंत मोरे यांना निमंत्रण, राज ठाकरे काय बोलणार?

मनसेच्या मुंबईतील मेळाव्याला वसंत मोरे यांना निमंत्रण, राज ठाकरे काय बोलणार?

मुंबई: मनसेतील अंतर्गत धुसफुस आता काही कोणापासून लपलेली नाही. पुण्यातील मनसेचे डॅशिंग नेते आणि माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांना इतर पदाधिकारी साईडलाईन करू पाहाताय, असं स्पष्ट चित्र पुण्यात आहे. खुद्द वसंत मोरेंनीही ते अनेकदा बोलून दाखवलं. मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेच्या आयोजनातही वसंत मोरे कुठेही दिसले नव्हते. त्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) आज मुंबईत मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. या बैठकीचं निमंत्रण वसंत मोरेंनाही (Vasant More) पाठवण्यात आलं आहे. मुंबईच्या वांद्रे येथील रंगशारदा (Rangsharda) सभागृहात हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे आता या मेळाव्याला वसंत मोरे येणार का? आणि आले तर ते राज ठाकरेंपुढे त्यांच्या तक्रारी मांडणार का?, हा प्रश्न आहे.

पुणे मनसेत अंतर्गत वाद

गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे आणि पुणे मनसेच्या स्थानिक नेत्यांमध्ये धुसफूस सुरु आहे. मनसेतील एका गटाकडून वसंत मोरे यांना सातत्याने डावलले जात आहे. त्यामुळे संतापलेल्या वसंत मोरे यांनी राज ठाकरे आल्याशिवाय मनसेच्या पुणे शहर कार्यालयात जाणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यांनी पुण्यातील सभेपूर्वी राज ठाकरेंशी चर्चा करणार असं सांगितलं होतं. मात्र, काही कारणास्तव ही चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे आजच्या पदाधिकारी मेळाव्यात वसंत मोरे त्यांची भूमिका राज ठाकरेंपुढे मांडण्याची शक्यता आहे.

‘पार्ट टाईम’ नेत्यांकडून वसंत मोरेंची टीम संपवण्याचा प्रयत्न?

“पुण्यातील मनसेचे काही ‘पार्ट टाईम’ नेते वसंत मोरे (Vasnat More) याने बांधलेली टीम संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. शहर कार्यालयात बसणारे नेते फर्स्टेट होऊन काम करत आहेत. मी शहराध्यक्ष असताना कधीही फर्स्टेट झालो नव्हतो. माझ्याविषयी गैरसमज आणि अफवा पसरवणारे हे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत”, असा सवाल वसंत मोरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उपस्थित केला होता.

वसंत मोरे हे पक्षातून बाहेर पडणार?

वसंत मोरे हे पक्षात नाखूश आहेत, पुण्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी त्यांचे खटके उडतात, वसंत मोरे पक्षातून बाहेर पडणार, अशा चर्चा सातत्याने सुरु आहेत. राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यात त्यांनी वसंत मोरे यांना भेटीसाठी वेळ दिली होती. मात्र, वसंत मोरे यांना न भेटताच राज ठाकरे हे पुण्यातून माघारी परतले होते. त्यामुळे वसंत मोरे हे मनसेत राहणार किंवा नाही, याबाबतच्या शंका-कुशंका आणि चर्चा होऊ लागल्या होत्या.

[ad_2]

Source link

राऊत म्हणाले, ‘मावळे असतात म्हणून राजे असतात’, आता संभाजीराजेंच्या मुलाकडून जोरदार प्रत्युत्तर

राऊत म्हणाले, ‘मावळे असतात म्हणून राजे असतात’, आता संभाजीराजेंच्या मुलाकडून जोरदार प्रत्युत्तर

सोलापूर : आपल्याला राजकारण फार काही कळत नाही पण काल माध्यमांत बातमी होती की, मावळ्यांमुळे छत्रपती घडतात. पण मला सांगायचंय की छत्रपतीही मावळे घडवतात. ही देवाण-घेवाणीची प्रक्रिया आहे, अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati ) यांचे चिरंजीव युवराज शहाजीराजे छत्रपती (Yuvraj Shahajiraje Chhatrapati) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना प्रत्युत्तर दिलं आहे. मावळे असतात म्हणून राजे असतात, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावर युवराज शहाजीराजे छत्रपती यांनी पलटवार केला आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आपल्याला सर्वपक्षीयांनी पाठिंबा द्यावा, असं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केलं होतं. खास करुन त्यांनी शिवसेनेला विनंती केली होती. परंतु शिवबंधन बांधा, आम्ही तुमची उमेदवारी जाहीर करतो, अशी भूमिका सेनेने घेतली. सेनेची भूमिका संभारीजेंना मान्य नसल्याने सध्या त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचं वृत्त आहे. तत्पूर्वी संभाजीराजे-सेना यांच्या घमासानादरम्यान संभाजीराजे छत्रपती यांचे चिरंजीव युवराज शहाजीराजे छत्रपती यांनी राऊतांवर पलटवार केला आहे.

सोलापूर शहरातील सामाजिक संघटना संभाजी आरमारच्या १४ व्या वर्धापन दिनी शिवपूर्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार संभाजीराजे छत्रपती यांना निमंत्रित केले होते. मात्र राज्यसभा निवडणुकीच्या धामधुमीच्या पार्श्वभूमीवर ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्याऐवजी त्यांनी युवराज छत्रपती शहाजीराजे यांना सोलापूरात पाठवले होते. यावेळी केलेल्या मोजक्या भाषणात त्यांनी सूचक पण सध्याच्या राजकीय परिस्थितीला धरुन महत्त्वाचं विधान केलं.

यावेळी बोलताना आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे म्हणाले, “आम्हाला राजकारण कळत नाही. पण जे राजकीय नेते आमच्याकडे ४२ आमदार आहेत, असं म्हणतात त्यांचे ४२ आमदार एका छत्रपतींमुळे आहेत हे विसरु नये.” या कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे मतीन बागवान, सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित होते.

संजय राऊत काय म्हणाले होते?

“संभाजीराजेंना अपक्ष लढायचं असेल तर त्यांच्याकडे ४२ मतं असतील. आमच्याकडे त्यांनी प्रस्ताव दिला त्यावेळी गादीचा सन्मान, छत्रपतींचा सन्मान याचा विचार करुनच आम्ही त्यांना पुढील प्रस्ताव दिला. शेवटी मावळे असतात म्हणून राजे असतात”, असं सूचक वक्तव्य संजय राऊतांनी केलं.

[ad_2]

Source link