“या” बँकेने दिला खातेदारांना झटका; अनेक खातेधारकांचं होणार ‘नुकसान’?

मे महिन्याच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँकेने रेपो दरात अचानक वाढ करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी आरबीआयने रेपो दर 4 टक्क्यांवरून 4.4 टक्के केला होता. त्यानंतर बँकांनी कर्जावरील व्याजदरात वाढ केली. याचा परिणाम ग्राहकांनी केलेल्या मुदत ठेवी (FD) आणि बचत खात्यांच्या व्याजदरावरही झाला. अनेक बँकांनी व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली होती.

हेही वाचा  Maharashtra CM Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे नव्या अडचणीत सापडले! हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले,FIR दाखल

2 कोटींपेक्षा कमीच्या एफडीत बदल

अलीकडेच आयसीआयसीआय बॅंकेंने (Icici Bank) 2 कोटींपेक्षा कमी FD चे दर बदलले आहेत. बँकेने एफडीवरील व्याज्याच्या कालावधीत 290 दिवसांवरून 10 वर्षांपर्यंत बदल केला आहे. या निर्णायची अंमलबजावणी 16 मे 2022 पासून करण्यात आली. याशिवाय IDFC बँकेने (IDFC First Bank FD Rates) FD चे दर वाढवले ​​आहेत. 23 मे पासून लागू होणारा नवीन व्याजदर 1 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

हेही वाचा  देवेंद्र फडणवीस 10 तास मुंबईच्या बाहेर; तर शिंदे गटात सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू

अनेक खातेधारकांचं ‘नुकसान’

या सर्व घडामोडी दरम्यान यूनियन बॅंक ऑफ इंडियाने (Union Bank of India) व्याजदरात घट करण्याबाबत म्हटलंय. बँकेच्या या निर्णयामुळे खातेधारकांना झटका लागला आहे. युनियन बँकेने बचत खात्यावरील व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. बँकेकडून 50 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजदरात 15 बेसिस पॉइंट्सने कपात केलीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here