जॉब अपडेट: शिक्षक भरतीचा अडसर झाला दूर, तब्बल 1293 जागांसाठी होणार भरती

महाराष्ट्र राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय त्याचप्रमाणे उच्च माध्यमिक शाळांमधील प्राध्यापकांच्या वाढीव पदांचा प्रश्न मार्गी लागला आहे. या अंतर्गत एकूण शिक्षकांची 1293 पदे भरली जाणार आहेत.

राज्यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील 1293 वाढीव पदांपैकी 1028 पदांची माहिती मंत्रालयात सादर करण्यात आलेली असून उर्वरित 265 पदांची माहिती दोन दिवसात मंत्रालयामध्ये सादर केले जाणार आहे, असे आश्वासन राज्याचे शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिले. त्यामुळे राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय आणि उच्च माध्यमिक शाळांमधील प्राध्यापकांच्या वाढीव पदांचा प्रश्न मार्गी लावणे शक्य होणार आहे.

हेही वाचा  राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उस्मानाबाद इथे वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स पदांसाठी भरती

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्न –

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आपण सर्व शिक्षक व पदवीधर आमदार यांचे सोबत एकत्रित पाठपुरावा करत असल्याचे डॉ. तांबे यांनी यावेळी सांगितले. रिक्त पदे पोर्टलमार्फत भरण्यासाठी लवकरच अभियोग्यता परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे संचालकांनी सांगितले.

हेही वाचा  ताजी बातमी! शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार; संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here