Indian Bank मध्ये विविध पदांची भरती, चांगले पद आणि पगाराची अशी दुसरी संधी मिळणार नाही

Indian Bank SO Recruitment 2022: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये(Public Sector Bank) भरतीची तयारी करत असलेल्या आणि बँकेत सरकारी नोकरीसाठी (Government Job) इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी कामाची बातमी आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील राष्ट्रीयीकृत बँकांपैकी (Nationalized Bank)एक असलेल्या इंडियन बँकेमध्ये (Indian Bank) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

इंडियन बॅंकेच्या (Indian Bank Recruitment) विविध विभागांमध्ये ३१२ विशेषज्ञ अधिकारी पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया २४ मे २०२२ पासून सुरू झाली आहे. इंडियन बँकेतील स्पेशलिस्ट ऑफिसरच्या (Specialist Officer) पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी विहित पात्रता सीए/ आयसीडब्ल्यूए/ पीजी/ ग्रॅज्युएशन किंवा पीजी डिप्लोमा या पदांनुसार उत्तीर्ण केलेला असावा.

हेही वाचा  स्टंट करण्याच्या नादात झाला मोटरसायकलचा भीषण अपघात, पाहा धक्कादायक VIDEO


अनुभव
व्यवस्थापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे ३ वर्षे, वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी ५ वर्षे आणि मुख्य व्यवस्थापक पदासाठी ७ वर्षे इतका अनुभव असणे आवश्यक आहे. दरम्यान सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी पूर्वीचा अनुभव आवश्यक नाही.

हेही वाचा  महाविकास आघाडीला लागणार झटका; आणखी 10 आमदार संपर्कात असल्याचा शिंदेंचा दावा

वयोमर्यादा
सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी उमेदवारांचे वय २० ते ३० वर्षे, व्यवस्थापक पदासाठी २२ वर्षे ते ३५ वर्षे, वरिष्ठ व्यवस्थापक पदांसाठी २५ ते ३८ वर्षे आणि मुख्य व्यवस्थापक पदांसाठी उमेदवारांचे वय २० ते २७ वर्षे दरम्यान असावे. तथापि, विविध आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना विहित नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत देण्यात येणार आहे. भरती जाहिरातीमध्ये यासंदर्भातील अधिक तपशील देण्यात आला आहे. पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

हेही वाचा  प्रियकरासोबत पळाली बायको, नवऱ्याने दुसरं लग्न करताच आली परत


या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज १४ जूनपर्यंत बँकेच्या अधिकृत वेबसाइट indianbank.in पाठवायचे आहेत. उमेदवारांना त्याच तारखेपर्यंत ८५० रुपये विहित शुल्क भरावे लागेल. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here