प्रतिनिधी, नाशिक
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत (Maharashtra State Board of Technical Education, MSBTE) राज्यभरातील पदविका महाविद्यालयांमध्ये तक्रारी निवारण समिती स्थापन करण्याचा आदेश देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारी थेट मंडळाकडे येऊ न देता, आधी या समितीमार्फत सोडविल्या जाव्यात, अशी सूचनाही ‘एमएसबीटीई’ (MSBTE)मार्फत देण्यात आली आहे.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (All India Council of Technical Education) सूचनेनुसार देशभरातील सर्व पदविका महाविद्यालयांना या आदेशाची लवकर अंमलबजावणी करावी लागणार असून, त्यासाठी ‘एमएसबीटीई’ (MSBTE) मार्फत महाविद्यालयांना सूचना देण्यात आली आहे. यासाठी संस्था प्रमुखांना संस्था स्तरावर या तक्रार निवारण समितीची स्थापना करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह महाविद्यालयाशी संबंधित काहीही तक्रारी असल्यास त्याचे निवारण या समितीला करावे लागणार आहे. तसेच या समितीच्या निर्णयाशी किंवा समितीने दिलेल्या कारणांशी सहमत नसल्यास विद्यार्थ्याला मंडळाने नियुक्त केलल्या लोकपालशी संपर्क साधता येणार आहे. यासाठी तंत्रशिक्षण मंडळामार्फत डॉ. धनंजय तळंगे यांची लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मंडळाकडे थेट तक्रार नको!
शिक्षण संस्था किंवा महाविद्यालयाबाबत काही समस्या असल्यास विद्यार्थी थेट राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडे तक्रार दाखल करतात. त्यामुळे देशपातळीवरून ही समिती स्थापन करण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे ‘एमएसबीटीई’मार्फत सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या तक्रारी समितीकडे येण्यापूर्वी थेट मंडळाकडे येणार नाहीत याची दक्षता महाविद्यालयांना घ्यायची असून, या समितीची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी लागणार आहे.
[ad_2]
Source link