‘स्कॅम १९९२’ नंतर आता येतेय तेलगीवरची ‘स्कॅम २००३’ वेब सीरिज, टीझर पाहिलात का?

[ad_1]

मुंबई : ‘स्कॅम १९९२: द हर्षद मेहता स्टोरी’च्या यशानंतर आता पडद्यावर दुसऱ्या स्कॅमची पूर्ण कथा येणार आहे. काही महिन्यांपूर्वी अप्लॉज एंटरटेन्मेंटने ‘स्कॅम २००३: द तेलगी स्टोरी’ची घोषणा केली होती. स्कॅम १९९२ ला भरपूर यश मिळालं होतं. आता फळ विक्रेता तेलगीची भूमिका करण्यासाठी अभिनेताही मिळाला. थिएटर आर्टिस्ट गगन देव रियार ही भूमिका करत आहे.

दुसऱ्यांदा लग्न, तिसऱ्यांदा हनिमून; सोनालीच्या फोटोंनी वातावरण तापलं

हेही वाचा  Shamshera Teaser Out: रणबीर कपूर येतोय डाकूच्या भूमिकेत, शमशेराच्या भूमिकेतून धमाकेदार पुनरागमन करणार आहे.

ही वेब सीरिज कर्नाटकमध्ये खानापूर इथे जन्मलेला फळ विक्रेता अब्दुल करीम तेलगीचं आयुष्य आणि त्यानं केलेले घोटाळे पुढे आणणार आहे. अनेक राज्यात हे घोटाळे केले गेले. अब्दुल करीम तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्यांचा मास्टर माइंड होता.

हंसल मेहताचं दिग्दर्शन


स्कॅम २००३ वर पत्रकार संजय सिंह यांनी ‘रिपोर्टर की डायरी’ हे पुस्तक लिहिलं. त्यांनी हे घोटाळे उघड केले होते. वेब सीरिजचं दिग्दर्शन राष्ट्रीय पारितोषिक विजेता हंसल मेहता आणि तुषार हिरानंदानी करणार आहेत. ही सीरिज सोनी लिववर दाखवली जाईल. त्याचा टीझर रिलीज झाला आहे.

‘स्कॅम १९९२’ खूप गाजली

‘स्कॅम १९९२’मध्ये प्रतीक गांधी, हेमंत खेर, चिराग वोहरा, जय उपाध्याय आणि श्रेया धनवंतरीसह सगळ्यांनीच दमदार अभिनय केला. ही सीरिज होती १० भागांमध्ये. लोकांची तिला खूप पसंती मिळाली होती. कथेबरोबर कलाकारांच्या अभिनयाचंही कौतुक झालं. म्हणूनच आता स्कॅम २००३ बद्दल उत्सुकता वाढली आहे. सोनी लिववर ही पाहता येईल.

सुहाना खानचे वाढदिवसाचे Photo पाहून अनन्या पांडेनं विचारला प्रश्न, मिळालं 91644728[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here