राज्यसभा उमेदवारीवर संजय पवारांची पहिली प्रतिक्रिया, साहेबांनी सांगितलं तर…

कोल्हापूर : राज्यात राज्यसभा निवडणुकांवर सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. अशात आपल्याला उमेदवारी मिळाली तर आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिली आहे. राज्यसभेसाठी माझ्या नावाची चर्चा आहे. हे मला माध्यमांतूनच समजलं. पण याबाबत अद्याप वरिष्ठ नेत्यांकडून काहीही सिग्नल नाही. कोणाचाही फोन आलेला नाही, असंही संजय पवार यांनी स्पष्ट केलं आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

खरंतर, राज्यसभेसाठी शिवसेना कोणाच्या नावाची घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. त्यात संजय पवार यांच्या नावाचीही चर्चा आहे. यावर बोलताना संजय पवार म्हणाले की, माझ्या नावाची चर्चा असल्याचं मला माध्यमांकडूनच कळालं. या यादीमध्ये आढळराव पाटील, उर्मिला मातोंडकर, चंद्रकांत खैरे यांच्या नावाचीही चर्चा आहे. पण मला संधी मिळाली तर नक्की चांगलं काम करून दाखवू’


‘मी ३० वर्ष शिवसेनेसोबत काम केलं. आम्ही मातोश्रीला नेहमी दैवत म्हणून पाहिलं आहे. काही मिळावं यासाठी कधीही काम केलं नाही. १५ वर्ष नगरसेवक, १४ वर्ष जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख म्हणून काम पाहिलं, तालुका प्रमुख म्हणून काम पाहिलं. सर्वसामान्य शिवसैनिकाला उच्चस्तरावर नेणारा हा पक्ष आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात पद देण्याबाबत काही असेल तर देतील. नाही दिलं तरी शिवसैनिक म्हणून काम करण्याची तयारी’ असंही यावेळी संजय पवारांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा  Zee sammelan 2022:आता महाराष्ट्र सरकारचे संकट संपणार? गडकरी म्हणाले - पुढे काय होते ते पहा

संभाजीराजेंच्या विरोधात लढणार का?…

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीतीली सहाव्या जागेवरून लढण्यासाठी संभाजीराजे छत्रपती इच्छूक आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात उमेदवारी मिळाली तर काय? असा सवाल विचारला असता मी छत्रपती घराण्याचा आदर करतो. मी ऐवढा मोठा नाही. ते आदरणीय कुटुंब आहे. राजेंचा माझ्याकडून अपमान व्हावा अशी माझी अपेक्षा नाही. पण जर असा आदेश आला तर लढणार. संधी मिळाली तर चांगलं काम करून दाखवणार, पण शेवटी उद्धव ठाकरेंचा निर्णय अंतिम असेल असं पवार यांनी सांगितलं.

हेही वाचा  Political Update: बंडखोर एकनाथ शिंदे यांनी 50 आमदार त्यांच्या पाठीशी असल्याचा केला दावा

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here