[ad_2]
‘कुछ फोटो अच्छे भी होते है, और सच्चे भी होते है,’ या कॅप्शनसह सचिन मोरे यांनी बृजभूषण सिंह यांचे फोटो शेअर केले असून याद्वारे त्यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांच्या दौऱ्याला होत असलेल्या विरोधामागे राष्ट्रवादीचाच हात असल्याकडे सचिन मोरे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे.
फोटो नेमका कोणत्या कार्यक्रमातील?
बृजभूषण सिंह हे गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय कुस्ती महासंघांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, तर शरद पवार हे राज्य कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आहेत. मनसे नेत्याने शेअर केलेले फोटो एका कुस्ती स्पर्धेतीलच असल्याचं दिसत आहे. सन्मान लाल मातीचा, बहुमान मावळवासियांचा, असं या फोटोतील बॅनरवर लिहिलेलं दिसत आहे.
[ad_2]
Source link