पुन्हा एकदा ‘जिंदगी गुलजार है’ सुरू, पाकिस्तानचे काजोल-शाहरुख सध्या काय करतायत?

[ad_1]

मुंबई : पाकिस्तानी मालिका जिंदगी गुलजार है पुन्हा एकदा लोकांच्या आग्रहामुळे टीव्हीवर सुरू झाली आहे. जारुन आणि कशफ यांची जोडी पुन्हा एकदा स्क्रीनवर दिसल्यामुळे फॅन्स खूश आहेत. ही मालिका २०१४ मध्ये भारतात दाखवली होती. तेव्हा फवाद खान आणि सनम सईदला प्रेक्षक इतकं डोक्यावर घेतील ही कल्पना नव्हती. आता ८ वर्षांनी पुन्हा एकदा ही मालिका टीव्हीवर परतली आहे.

‘स्कॅम १९९२’ नंतर आता येतेय तेलगीवरची ‘स्कॅम २००३’ वेब सीरिज, टीझर

जिंदगी गुलजार है ही मालिका पाकिस्तानातली सर्वात लोकप्रिय मालिका. फवाद खान आणि सनम सईद घराघरात पोहोचले, लोकप्रिय झाले. यांची जोडी सर्वांची आवडती होती. अनेक फिल्म मेकर्सनी त्यांना एकत्र काम दिलं. पाकिस्तानचे शाहरुख-काजोल म्हणून ते प्रसिद्ध झाले.

हेही वाचा  Shamshera Teaser Out: रणबीर कपूर येतोय डाकूच्या भूमिकेत, शमशेराच्या भूमिकेतून धमाकेदार पुनरागमन करणार आहे.

१० वर्षांनंतर अशी दिसते सनम सईद


‘जिंदगी गुलजार है’ पाकिस्तानात २०१२ मध्ये सुरू झाली. आता १द वर्षांनी फवाद खान आणि सनम सईद यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं आहे. फवाद खाननं बाॅलिवूडमध्ये २ सिनेमे केलेत. सनम सईदनेही पाकिस्तानात अनेक सिनेमे आणि शोज केलेत.

२०१०पासून करियरची सुरुवात


सनम सईदने २०१० मध्ये पाकिस्तानी टीव्ही सीरियल ‘दाम’मध्ये सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम सुरू केलं होतं. त्यानंतर तिनं टीव्ही सीरियलमध्ये छोट्या भूमिका केल्या. पण २०१२ मध्ये सईदला जिंदगी गुलजार है मालिकेत काम करण्याची संधी मिळाली आणि तिचं करियर गुलजारच झालं. ती मोठी स्टार बनली. फवाद खानसोबत तिची जोडी एव्हरग्रीन ठरली.

ग्लॅमरस नसलेली भूमिका केली


सनम सईदनं कशफ मुर्तजा नावाच्या मध्यमवर्गीय मुलीची भूमिका साकारली. लहानपणी घरी प्रचंड गरिबी असलेली. एकटीनं केलेला संघर्ष प्रेक्षकांना आवडला. याआधी सनम ग्लॅममरस भूमिका करायची. या साध्या भूमिकेनं चार चाँद लागले.

कशफ होऊन मिळवलेले पुरस्कार


सनम सईदला या भूमिकेसाठी ३ पुरस्कार मिळाले होते. ती चांगली गायिकाही आहे. कोक स्टुडिओ पाकिस्तानच्या तिसऱ्या सिझनमध्ये तिनं परफाॅर्म केलं होतं.

सुहाना खानचे वाढदिवसाचे Photo पाहून अनन्या पांडेनं विचारला प्रश्न, मिळालं

सनम सईद आहे घटस्फोटित


सनमचा निकाह तिच्या लहानपणीचा मित्र फरहान हसनशी केला होता. २०१५ ला निकाह झाला आणि २०१८ मध्ये तलाक झाला.

परी शिकवतेय विश्वजीत आजोबांना डान्स[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here