दुदैवी! पती-पत्नीवर वाघाचा हल्ला; पत्नीचा मृतदेह मिळाला, पती बेपत्ता

[ad_2]

चंद्रपूर : तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या पती-पत्नीवर वाघाने केलेल्या हल्ल्यात पत्नी ठार झाली असून पती बेपत्ता आहे. पतीला वाघाने उचलून नेले असावे असा अंदाज बांधण्यात येत आहे. ही दुदैवी घटना जिल्ह्यातील चिमुर तालुक्यात येणाऱ्या केवाडा येथे घडली. मीना जांभुळकर असे मृतक महीलेचे नाव आहे. तर पती विकास जांभुळकर हा बेपत्ता आहे. (tiger attacks on husband and wife in chandrapur)

हेही वाचा  TV वर चविष्ट जेवण पाहून भुकेल्या कुत्र्याने स्क्रीन चाटायला सुरुवात केली, पाहा हा आश्चर्यचकित व्हिडिओ

चंद्रपूर जिल्ह्यात वाघ-मानव संघर्षाने टोक गाठले आहे. अलिकडील काळात वन्यजीवांचे हल्ले वाढले आहेत. त्यात तेंदुपत्ता संकलन सुरू असून मजूर मोठ्या प्रमाणावर तेंदुची पाने तोडायला जंगलात जात आहेत. तेंदु हंगामादरम्यान वाघाच्या हल्याच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे.

क्लिक करा आणि वाचा- वाघडोहची चाल ऐटबाज, मुद्रा करारी!, ताडोब्यात चाहत्यांकडून श्रद्धांजली अर्पण

जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात येणाऱ्या केवाडा येथिल विकास जाभुळकर आणि त्यांचा पत्नी मिना जाभुळकर तेंदु संकलनासाठी जंगलात गेले.तेंदु संकलन करीत असताना वाघाने हल्ला केला.या हल्यात मीनाबाई जांभुळकर यांच्या घटनास्थळीच मृत्यू झाला. तर विकास जांभुळकर हा बेपत्ता आहे.

हेही वाचा  महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता; आदित्य ठाकरेंनी हटवला ट्विटरवरील मंत्रीपदाचा उल्लेख

क्लिक करा आणि वाचा- पेपर मिलच्या लाकूड डेपोला भीषण आग; साडेसात कोटींचे लाकूड जळून खाक, पेट्रोल पंपही जळाले

या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वनविभाग बेपत्ता पतीचा शोध घेत आहे.

हेही वाचा  Maharashtra Political Crisis: महाराष्ट्र विधानसभा बरखास्त होणार! MVA बैठकीत हा निर्णय घेतला जाऊ शकतो

क्लिक करा आणि वाचा- ‘नो कास्ट ,नो रिलीजन’; जात, धर्ममुक्तीचं महाराष्ट्रात केवळ एकाच महिलेकडे असणार प्रमाणपत्र

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here