तारकर्ली बोट दुर्घटनेत शिवसेना आमदाराच्या भाच्याचा मृत्यू

[ad_2]

सिंधुदुर्ग : मालवणमधील तारकर्लीच्या समुद्रकिनाऱ्यावर आज दुपारच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली आहे. येथील समुद्रात पर्यटकांना स्कुबा डायव्हिंगसाठी घेऊन गेलेली बोट उलटली. ही बोट समुद्रात उलटली तेव्हा त्यामध्ये २० जण होते. यापैकी दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत आकाश देशमुख याचा समावेश आहे. हा बाळापूर मतदार संघातील शिवसेना आमदार नितिन देशमुख यांचा भाचा आहे.

हेही वाचा  Twitter ने Android आणि iOS वर क्लोज्ड कॅप्शन फीचर लाँच केले, कसे वापरायचे ते जाणून घ्या

शिवसेना आमदाराच्या भाच्याचा मृत्यू…

आज सकाळी तारकर्लीच्या समुद्रकिनाऱ्यावर २० जणांना घेऊन ही बोट स्कुबा डायव्हिंगसाठी गेली होती. तेथून परत येताना घात झाला. ही बोट समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर असतानाच अचानक उलटली. बोट उलटल्यानंतर पर्यटकांना वाचावण्यासाठी मदतकार्य सुरु झाले. या सर्वांना समुद्रातून बाहेर काढेपर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत आकाश देशमुख याचा समावेश आहे. हा बाळापुर मतदार संघातील शिवसेना आमदार नितिन देशमुख यांचा भाचा आहे.

हेही वाचा  श्रावण 2022: या दिवसापासून सुरू होत आहे श्रावणचा पवित्र महिना, या राशींवर आहेत शिवजींची कृपा, जाणून घ्या सोमवारच्या तारखा

बाळासाहेबांचा आशीर्वाद आणि उद्धवजींचा विश्वास, मी आज भरुन पावलो : संजय पवार
दोन जण गंभीर जखमी…

दरम्यान, दोन जण गंभीर जखमी झाले. या जखमींवर सध्या मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बोटीतील सर्व पर्यटक हे पुणे आणि मुंबईतील असल्याचं समोर आलं आहे. मात्र, बोट समुद्रात अचानक का उलटली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तारकर्लीचा समुद्रकिनारा हा स्कुबा डायव्हिंग आणि वॉटर स्पोर्टससाठी प्रसिद्ध आहे. या दुर्घटनेमुळे सध्या तारकर्लीच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये धास्तीचे वातावरण आहे.

हेही वाचा  महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता; आदित्य ठाकरेंनी हटवला ट्विटरवरील मंत्रीपदाचा उल्लेख

GT vs RR Live Score, IPL 2022 : गुजरात आणि राजस्थानच्या सामन्याचे लाइव्ह अपडेट्स

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here