ओबीसी भाजपचा डीएनए, आरक्षणासाठी ठाकरे सरकारविरोधात लढा तीव्र करणार: फडणवीस

मुंबई:ओबीसी आरक्षण जाणे हे या सरकारचं पाप आहे. हे शयडंत्र आहे. त्यांच्या मनात पाप होतं म्हणून ओबीसी आरक्षण यांनी घालवलं, असं म्हणत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टिकास्त्र सोडलं. तसेच, ओबीसी हा भाजपचा डीएनए आहे, ओबीसी आरक्षणासाठी ठाकरे सरकारविरोधात लढा तीव्र करणार, असा एल्गारही फडणवीसांनी केला. भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यसमिती बैठकीत फडणवीस बोलत होते.

हेही वाचा  Rail Vikas Nigam Limited Share: रेल्वेचा हा शेअर 30 रुपयांचा आहे, तज्ज्ञांचा सल्ला- आता खरेदी केल्यास श्रीमंत व्हाल

“१३ डिसेंबर २०१९ ला सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला ट्रिपल टेस्ट सांगितली. ४ मार्च २०२१ पर्यंत सरकारने टाईमपास केला. ८ वेळा तारखा घेतल्या. त्यामुळे रागाने सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात लिहिलं की सरकारला काही करायचं नाहीये. त्यामुळे आम्ही तारीख का द्यायची. त्यामुळे त्यांनी ओबीसी आरक्षण स्थगित केलं. त्यानंतरही आजपर्यंत हे इम्पेरिकल डेटा तयार करू शकले नाही”, असं म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

हेही वाचा  PM Kisan Mandhan Yojana: मोदी सरकार देत आहे शेतकऱ्यांना 3 हजार रुपये, काय योजना आहे?

‘ओबीसी आरक्षणाचे हत्यारे हे सरकार आहे’

“या निर्णयाचा पहिला फटका हा मध्यप्रदेशला बसला. पण, मध्यप्रदेशने करून दाखवलं. त्यांनी इम्पेरिकल डेटा तयार केला म्हणून त्यांना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचा निर्णय दिला. म्हणून मी म्हणतो की ओबीसी आरक्षण जाणे हे या सरकारचं पाप आहे. कारण, एकवर्षाआधी महाराष्ट्र इम्पेरिकल डेटा तयार करू शकले असते. पण, त्यांच्या मनात पाप होतं. ओबीसी आरक्षणाचे हत्यारे हे सरकार आहे. ओबीसी हा भाजपचा डीएनए आहे, श्वास आहे. हे शडयंत्र आहे. आता शांत बसलो तर ओबीसी आरक्षण कधीच मिळणार नाही. ओबीसी आरक्षणासाठी ठाकरे सरकारविरोधात लढा तीव्र करणार”, असा एल्गार फडणवीसांनी केला.

हेही वाचा  मुलं वयात आले की एकटं राहण्याची कारणं का शोधतात? जाणून घ्या या मागची कारणं

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here