NEET PG 2022 दोन लाखांहून अधिक उमेदवारांनी दिली परीक्षा

[ad_1]

NEET PG 2022: राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट पीजी २०२२ चे आयोजन २१ मे रोजी करण्यात आले होते. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (National Board Of Examinations) ने २६७ शहरांमधील ८४९ परीक्षा केंद्रांवर नीट पीजी (NEET PG 2022) परीक्षेचे आयोजन केले होते. नीट पीजी स्थगिती आणि नंतर परीक्षा घेण्यासंदर्भात झालेला वादविवाद, मतमतांतरे, कोर्टापर्यंत गेलेले प्रकरण… या सर्व पार्श्वभूमीवर ही परीक्षा अखेर पार पडली. देशभरातली सर्व परीक्षा केंद्रांवर परीक्षेचे आयोजन सुरळीत झाले.

नीट पीजीसाठी एकूण २ लाख ६ हजार ३०१ उमेदवारांनी नोंदणी केली होती आणि एकूण १ लाख ८२ हजार ३१८ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. अधिकृत निवेदनानुसार, ‘एनबीईएमएस द्वारे नियुक्त केलेल्या १८०० हून अधिक विभागांनी परीक्षेच्या आयोजनासंदर्भातली माहिती दिली. टीसीएसच्या सुमारे १८ हजार पर्यवेक्षकांनी परीक्षेच्या आयोजनात सहभाग घेतला. जीबी, एनबीईएमएसच्या केंद्रीय पर्यवेक्षकांनी देखील परीक्षा केंद्रांवर देखरेख केली, केंद्राचे दौरे केले.’

हेही वाचा  रेशन कार्ड धारकांनो, तुमच्या फायद्यासाठी देशभरात नवी योजना लागू

जोरदार पावसामुळे सिलचर, आसाम भागात नीट पीजी 2022 (NEET PG 2022) परीक्षेच्या दरम्यान उमेदवारांना अडचणींचा सामना करावा लागला. स्थानिक प्रशासनाने रात्रीत एका तात्पुरत्या पुलाची व्यवस्था केली आणि उमेदवारांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी बस बुक केली.

हेही वाचा  Indian Railways Rules: आता विना तिकीट रेल्वेने प्रवास करता येणार, रेल्वेने खास नियम केले आहेत

नीट पीजी २०२२ साठी देशभरात उपस्थित होणाऱ्या उमेदवारांनी आणि परीक्षा अधिकाऱ्यांनी कोविड-१९ दिशानिर्देशांचे पालन केले. मास्क घालणे, हँड सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले.

UPSC: NDA/NA च्या ४०० आणि CDS च्या ३३९ पदांवर भरती; अधिसूचना जारी
सीईटी लांबणीवर? खासगी विद्यापीठांना होणार लाभ
CLAT 2022 Tips: लॉ प्रवेशाची तयारी करताय? या टिप्स करा फॉलो, मिळतील चांगले गुण

हेही वाचा  स्टंट करण्याच्या नादात झाला मोटरसायकलचा भीषण अपघात, पाहा धक्कादायक VIDEO

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here