नवी दिल्ली : Sony Smart TV Launched: Sony Bravia X80K स्मार्ट टीव्ही सीरीज भारतात लाँच झाली आहे. कंपनीचा लेटेस्ट ४के स्मार्ट टीव्ही लाइनअप ५ डिस्प्ले पर्यायासह येतो. यात ७५ इंच, ६५ इंच, ५५ इंच, ५० इंच आणि ४३ इंच स्मार्ट टीव्हीचा समावेश आहे. यामध्ये एचडीआर१०, एचएलजी आणि डॉल्बी व्हिजनचा सपोर्ट दिला आहे. साउंडसाठी डॉल्बी ऑडिओ, डॉल्बी एटमॉस आणि डीटीएस डिजिटल सराउंड सपोर्टसह १० वॉटचे स्पीकर दिले आहेत. हे गुगल टीव्हीवर काम करतात. यात गुगल असिस्टेंट आणि अॅलेक्साचा सपोर्ट मिळेल. टीव्हीमध्ये क्रोमकास्ट बिल्ट-इनसह अॅपल एअरप्लेचा देखील सपोर्ट दिला आहे.
Sony Bravia X80K स्मार्ट टीव्हीची किंमत
भारतात Sony Bravia X80K स्मार्ट टीव्हीच्या सर्व मॉडेलच्या किंमतीचा खुलासा करण्यात आलेला नाही. केवळ ५५ इंच मॉडेलची (KD-55X80K) किंमत सांगितली असून, जी ९४,९९० रुपये आहे. कंपनीने अद्याप ४३-इंच (KD-43X80K), ५०-इंच (KD-550X80K), ६५-इंच (KD-65X80K) आणि ७५-इंच (KD-75X80K) मॉडेलची किंमत अद्याप सांगितलेली नाही. ५५ इंच मॉडेल खरेदीसाठी उपलब्ध झाले आहे. नवीन सीरिजचे इतर व्हेरिएंट देखील लवकरच सोनी सेंटर, प्रमुख इलेक्ट्रॉनिक स्टोर आणि ई-कॉमर्स पोर्टलवर उपलब्ध होईल.
Sony Bravia X80K स्मार्ट टीव्हीचे स्पेसिफिकेशन्स
Sony Bravia X80K स्मार्ट टीव्ही लाइनअप ४के (३८४०x२१६० पिक्सल) एलसीडी डिस्प्लेसह एचडीआर१०, डॉल्बी व्हिजन आणि एचएलजी फॉर्मेटसह पाच स्क्रीन साइजमध्ये उपलब्ध आहे. कंपनीद्वारे Triluminos Pro डिस्प्लेवर स्क्रीनवरील कलर वाढवण्याचा दावा करण्यात आला आहे. बेझलमध्ये ब्लॅक शेड आणि पॅनेल रिफ्रेश रेट ५० हर्ट्ज आहे. टीव्ही Sony ४K HDR प्रोसेसर X१ सह येतात. यात १६ जीबी इनबिल्ट स्टोरेज, रन-ऑन Google TV (Android TV वर आधारित) दिले आहे. यूजर्स Google Play स्टोरवरून इतर अॅप्स डाउनलोड करू शकतात. ऑडिओसाठी डॉल्बी ऑडिओ, डॉल्बी एटमॉस, डीटीएस डिजिटल सराउंड आणि साउंड ऑटो-कॅलिब्रेशनसह दोन १० वॉटचे स्पीकर दिले आहेत. गेमिंगसाठी एचडीएमआय २.१ मध्ये लो लेटेंसी मोड दिला आहे.
नवीन सीरिजमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ड्यूल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ v४.२, चार एचडीएमआय पोर्ट, बिल्ट-इन क्रोमकास्ट, एक ऑडिओ जॅक आणि दोन यूएसबी पोर्ट दिले आहेत. यात रिमोट वॉइस कमांडचा सपोर्ट मिळतो. वॉइस कमांडसाठी यात बिल्ट-इन मायक्रोफोन आहेत. स्मार्ट टीव्ही मॉडेल अॅपल एअरप्ले आणि होमकिट सपोर्ट करतात, जे आयपॅड आणि आयफोन सारख्या अॅपल डिव्हाइसद्वारे कंटेंट स्ट्रीमिंग करण्यास मदत करते.
[ad_2]
Source link