Tuesday, May 24, 2022
Homeज्योतिषराशिभविष्य 15 मे 2022

राशिभविष्य 15 मे 2022

मेष –

आजचा आपला दिवस मित्र आणि सामाजिक कार्ये यांच्यामागे धावपळ करण्यात जाईल. पैसाही खर्च होईल. नवीन मित्रांच्या ओळखी होतील. भविष्यात त्यांचा उपयोग होईल. 

वृषभ  –

आजचा दिवस शुभफले देणारा आहे असे श्रीगणेश सांगतात. विशेषतः धंदाव्यवसाय करण्यार्‍यांना आज फारच लाभदायक दिवस आहे. पदोन्नतीचा योगही आहे. 

मिथुन –

आपल्याला आज प्रतिकूल दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. मानसिक व्यग्रता, शारीरिक शिथिलता अनुभवास येईल. काम करायला उत्साह वाटणार नाही. 

कर्क –

हेही वाचा  राशिभविष्य 22 मे 2022

वैचारिक नकारात्मकता मनात असल्याने दिवसभर अस्वस्थ राहाल. म्हणून तो दूर ठेवा असे श्रीगणेश सांगतात. रागावर आज संयम ठेवावा लागेल. खर्च अधिक होईल. 

सिंह –

आज पति-पत्नींचे एकमेकांशी पटणार नाही. बेबनाव होईल, त्यामुळे क्लेश होतील असे श्रीगणेश सुचवितात. दोधापैकी एकाचे स्वास्थ्य बिघडणार नाही याकडे लक्ष द्या. 

कन्या-

व्यवसाय धंद्यात आज यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. सहकार्‍यांचे सहकार्य वाढेल. कुटुंबातील वातावरण सुखाचे असेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. 

हेही वाचा  राशिभविष्य 24 मे 2022

तूळ-

तुमची वैचारिक आणि मधुर वाणी लोकांना प्रभावित करेल व तसेच त्यामुळे इतर व्यक्तींशी संबंध दृढ होतील. चर्चा- वादविवाद यात ही तुमचा प्रभाव राहील. 

वृश्चिक-

मित्रपरिवाराशी सावधपणाने वागा असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक व मानसिक अस्वस्थता राहील. मातेचे स्वास्थ्य बिघडू शकते. धन आणि किर्तीची हानी होईल. 

धनु-

प्रतिस्पर्ध्यांवर तुम्ही मात कराल असे श्रीगणेश म्हणतात. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आज चांगले राहील. नवीन कामाची सुरूवात करण्याला अनुकूल दिवस.  

मकर –

हेही वाचा  राशिभविष्य 23 मे 2022

आजचा दिवस मिश्रफल देणारा आहे. कुटुंबातील लोकांबरोबर गैरसमजातून मतभेदाचे प्रसंग गडतील. व मन दुःखी होईल. विनाकारण खर्च होईल. 

कुंभ – 

आजचा दिवस तुम्हाला आर्थिक दृष्ट्या लाभदायी आहे. परिवारात आनंदी वातावरण असेल. मित्र आणि कुटुंबीय यांच्याबरोबर आनंदात दिवस घालवाल. 

मीन –

स्थावर संपत्ती व कोर्ट- कचेरी याच्या झंझट मध्ये आज पडू नका असा सल्ला आज श्रीगणेश तुम्हाला देत आहेत. मनाच्या एकाग्रतेमुळे सर्व कामात फायदा होईल. तब्येत सांभाळा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments