Tuesday, May 24, 2022
HomeमनोरंजनVideo : सुहाना खान, खुशी कपूर,अगस्त्य नंदा यांचा 'द आर्चिस' लुक पाहिलात...

Video : सुहाना खान, खुशी कपूर,अगस्त्य नंदा यांचा ‘द आर्चिस’ लुक पाहिलात का?

मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटींइतकीच चाहत्यांमध्ये उत्सुकता असते ती स्टार्सची मुलं काय करताहेत याची. सेलिब्रिटींची मुलं मोठ्या पडद्यावर कधी झळकणार, ते कोणत्या सिनेमातून पदार्पण करणार याविषयी जाणून घेण्यात चाहत्याना कमालीचा उत्साह असतो. त्यात जर किंग खान शाहरूखची मुलगी सुहाना खान, श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर आणि बिग बी अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांना पडद्यावर झळकणाऱ्या सिनेमाचा विषय असेल तर चर्चा तर होणारच. या स्टार किडसचा डेब्यू करणारी दिग्दर्शिका झोया अख्तर हीदेखील गीतकार जावेद अख्तर यांची मुलगी आहे. त्यामुळे या सगळ्याच स्टार किडसचं जोरदार पॅकेज द आर्चिस या सिनेमातून प्रेक्षकांना मिळणार आहे.

हेही वाचा  केंद्र सरकारच्या या निर्णयावर भारावला सलमान खान, म्हणाला चुलबुल पांडेचं स्वप्न पूर्ण झालं


द आर्चिस हे लोकप्रिय कॉमिक्स आहे. या कॉमिक्समधील काल्पनिक पात्रांना भारतीय अंदाजात पडद्यावर आणण्यासाठी झोया अख्तरने दिग्दर्शनाची धुरा घेतली आहे. तर सुहाना खान, खुशी कपूर, अगस्त्य नंदा हे या सिनेमातून पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ओटीटी प्लाटफॉर्मवर नेटफ्लिक्सवर हा सिनेमा लवकरच येणार आहे. या फिल्मचं वैशिष्ट्य म्हणजे १९६० च्या काळातील चित्र उभं करण्यात आलं आहे. द आर्चिजच्या शूटिंगला एप्रिलमध्ये सुरुवात झाली आणि आता या सिनेमाचं पहिलं पोस्टर समोर आलं आहे. या पोस्टरमध्ये सुहाना, खुशी आणि अगस्त्य रेट्रो लुकमध्ये दिसत आहेत.

हेही वाचा  ना बृजभूषण यांचा समाचार, ना उद्धव ठाकरेंच्या 'मुन्नाभाई' ला प्रत्युत्तर; राज'गर्जना' नरमली?

द आर्चिज या कॉमिकमधील पात्रांनी वाचकांना भुरळ घातली आहेच, पण आता ही पात्रं भारतातील लुकमध्ये सिनेमात कशी दिसणार याचीही उत्सुकता आहे. पोस्टरमधून या लुकनेही लक्ष वेधलं आहे. सुहाना खान वेरोनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. खुशी कपूरने या सिनेमात बेट्टी हे पात्र साकारलं आहे. तर अगस्त्य नंदा आर्चिजच्या टायटल रोलमध्ये पहायला मिळणार आहे. याशिवाय या सिनेमात मिहिर आहुजा, डॉट, वेदांग रैना, युवराज मेंडा यांच्याही भूमिका आहेत.

हेही वाचा  'स्कॅम १९९२' नंतर आता येतेय तेलगीवरची 'स्कॅम २००३' वेब सीरिज, टीझर पाहिलात का?

केतळी चितळे आहे या दुर्मिळ आजाराने ग्रस्त, स्वत:च दिली माहिती


नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. या सिनेमातील कलाकारांचा लुक बघा आणि तुमचा आवडता ड्रेस निवडा असं म्हणत या सिनेमाच्या पोस्टरचं मार्केटिंग केलं आहे. तसंच अमिताभ बच्चन यांनीही त्यांचा नातू अगस्त्य नंदा याच्या अभिनय पदार्पणाबद्दल त्याला खूप शुभेच्छा दिल्या आहेत. या सिनेमाचा व्हिडिओही त्यांनी शेअर केला आहे. अजून एक उदय असं म्हणत त्यांनी अगस्त्यला आशीर्वादही दिले आहेत.

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments