अनेकदा जो आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करत असतो, तो अचानक सगळ्या समस्यांवर मात करतो आणि आपलं आयुष्य बदलून टाकतो. अलीकडेच ब्रिटनमधील एका तरुणासोबत असंच घडलं. ज्याचं आयुष्य गरिबीत जात होतं आणि तो बेघर झाला होता. परंतु, असं म्हणतात की ‘बुडणाऱ्याला काडीचा आधार’. या व्यक्तीसोबतही असंच घडलं आणि अचानक त्याला त्याच्या एका जुन्या बँक अकाऊंटची माहिती मिळाली.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, 25 वर्षीय ब्रँडन मार्बेक्स वयाच्या 22 व्या वर्षापर्यंत बेघर होता. त्याला राहायला जागा नव्हती आणि तो गरिबीत आयुष्य काढत होता. एक वेळ अशी आली की त्याच्याकडे असलेले सर्व पैसे संपण्याच्या मार्गावर होते. तो पूर्णपणे कंगाल होणार होता, इतक्यात त्याला एका वेबसाइटवरून कळालं की त्याच्या नावावर एक जुनं बचत बँक खातं आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, 25 वर्षीय ब्रँडन मार्बेक्स वयाच्या 22 व्या वर्षापर्यंत बेघर होता. त्याला राहायला जागा नव्हती आणि तो गरिबीत आयुष्य काढत होता.
एक वेळ अशी आली की त्याच्याकडे असलेले सर्व पैसे संपण्याच्या मार्गावर होते. तो पूर्णपणे कंगाल होणार होता, इतक्यात त्याला एका वेबसाइटवरून कळालं की त्याच्या नावावर एक जुनं बचत बँक खातं आहे. अचानक ब्रँडनला त्या अकाऊंटबद्दल वेबसाईटवरून कळालं, तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्यासाठी हे खातं आशेचा किरण बनून आलं होतं. खात्यात सुमारे 28 हजार रुपये होते. मिरर वेबसाइटशी बोलताना ब्रँडनने सांगितलं की, त्याची आई दर महिन्याला 10 पौंड म्हणजेच सुमारे 950 रुपये खात्यात टाकत असे. आईने अनेक वर्षे हे केलं आणि हेच पैसे इतके वाढले की ब्रँडनला यामुळे बेघर राहावं लागलं नाही. हे पैसे मिळण्यासाठी त्याला सुमारे 4 महिने लागले, परंतु त्या पैशातून त्याने भाड्याच्या घराची डिपॉझिट रक्कम दिली.