नीट पीजीद्वारे देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळतो. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नीट पीजी स्थगित करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. यानंतर या परीक्षेसाठी प्रवेश पत्र जारी करण्यात आले आहेत.
असे डाऊनलोड करा NEET PG 2022 Admit Card
१. उमेदवारांनी सर्वात आधी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE) च्या वेबसाइट nbe.edu.in वर जा.
२. होमपेज वर NEET PG Admit Card च्या लिंक वर क्लिक करा आणि नंतर लॉग इन करा.
३. आता तुमचे लॉग इन डिटेल्स नोंदवा आणि सबमिट बटण वर क्लिक करा.
४. तुमचे NEET PG अॅडमिट कार्ड स्क्रीन वर दिसेल.
५. अॅडमिट कार्ड डाऊनलोड करून एक प्रिंट आऊट घेऊन ठेवा.
पुढील गोष्टी ध्यानात घ्या –
अॅडमिट कार्ड डाऊनलोड केल्यानंतर उमेदवारांनी ते काळजीपूर्वक वाचावे. त्यातील परीक्षा केंद्र, परीक्षेची तारीख आणि वेळ आदी सर्व माहिती वाचावी. परीक्षेदरम्यान पालनदकरावयाच्या सूचनादेखील तेथे नमूद केलेल्या असतील. या सूचनांचे सर्व उमेदवारांना परीक्षेदरम्यान पालन करायचे आहे. उमेदवारांनी रिपोर्टिंग टाइम किंवा त्यापूर्वी परीक्षा केंद्रात पोहोचायचे आहे. उमेदवारांनी परीक्षेवेळी उशिराने केंद्रात येण्याची परवानगी नाही. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी आपलं अॅडमिट कार्ड, आधार कार्ड आणि एक पासपोर्ट साइज फोटो देखील जवळ बाळगावा.