Tuesday, May 24, 2022
HomeकरिअरIIT-B Convocation: आयआयटीच्या विद्यार्थ्यांची अनोखी गांधीगिरी! स्वत: विणणार त्यांचे दीक्षांत 'उत्तरिया'

IIT-B Convocation: आयआयटीच्या विद्यार्थ्यांची अनोखी गांधीगिरी! स्वत: विणणार त्यांचे दीक्षांत ‘उत्तरिया’

प्रत्येक पदवीधर विद्यार्थ्याच्या आयुष्यात दीक्षांत समारंभ खूप महत्त्वाची भूमिका बजावतो आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) बॉम्बे येथील विद्यार्थ्यांसाठी ते अधिक खास असेल कारण त्यांना त्यांच्या दीक्षांत समारंभाचा स्कार्फ (Convocation scarf or uttaria) हातमागावर विणायला मिळणार आहे. भारतातील समृद्ध कापड परंपरा जिवंत ठेवत नवीन पिढीला जुन्या पद्धतीची ओळख करून देण्याचा विचार यामागे आहे. आयआयटी मुंबईमधील इच्छुक विद्यार्थ्यांना या महिन्यापासून सुरू होणाऱ्या कार्यक्रमासाठी नोंदणी करावी लागेल. विणकामाच्या मूलभूत गोष्टी शिकण्यासाठी त्यांना एका महिन्यासाठी दर आठवड्याला पाच तास द्यावे लागतील. दीक्षांत स्कार्फ किंवा आयआयटी मुंबईत ‘उत्तरिया’ म्हणतात ते व्यावसायिक हातमाग विणकराच्या देखरेखीखाली बनवले जाईल. यापूर्वी २०१९ मध्ये एका विद्यार्थ्याने दीक्षांत स्कार्फ विणला होता.

हेही वाचा  Nawab Malik:'मलिकांचे डी-गँगशी संबंध' मलिकांनी मनी लाँड्रिंग केल्याचं कोर्टाचं निरीक्षण

मिठाच्या सत्याग्रहात ज्यांनी महात्मा गांधींसोबत सहभाग घेतला, त्या सत्याग्रहाच्या आणि सत्याग्रहींच्या सन्मानार्थ दांडी येथील राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मारकाच्या रचनेत आणि समन्वयामध्ये IIT-Bombay चे मोठे योगदान होते. गांधीजींनी सूतकताईचा सराव केला आणि हातमागात रस घेतला म्हणून, स्मारकाचे उद्घाटन झाल्यानंतर २०१९ मध्ये IIT-बॉम्बे येथील IDC स्कूल ऑफ डिझाइनमध्ये एक विणकाम स्टुडिओ स्थापन करण्यात आला. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून, आयआयटी-बॉम्बेमधील विद्यार्थी आणि प्राध्यापकांना कताई आणि विणकामाची ओळख झाली आहे. आयडीसी डिझाईनच्या विद्यार्थ्यांना निवडक अभ्यासक्रम देखील उपलब्ध करून देते.

हेही वाचा  Unauthorized Schools: राज्यातील ६७४ अनधिकृत शाळांवर कारवाईचे आदेश

अंतिम वर्षाच्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी त्यांचा दीक्षांत स्कार्फ विणण्याची योजना करोना काळात थांबवण्यात आली होती. तर यापूर्वी केवळ एक विद्यार्थी प्रातिनिधिक स्वरुपात हा स्कार्फ किंवा उत्तरिया विणत असे.

आता, हा नवीन उपक्रम आयआयटी-बॉम्बे मधील सर्व अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केल्यामुळे, IDC स्कूल ऑफ डिझाईनमधील स्टुडिओ तीन खोल्यांमध्ये विस्तारित करण्यात आला आहे, प्रत्येक खोल्या हिरवा, निळा आणि लाल अशा वेगळ्या रंगासाठी समर्पित आहे. हे रंग विद्यार्थी अनुक्रमे IIT बॉम्बे, अंडरग्रॅज्युएट (UG), पदव्युत्तर (PG) आणि PhD मधून मिळणारी पदवी दर्शवतात. पन्नास विद्यार्थ्यांनी या उपक्रमासाठी आधीच नोंदणी केली आहे तर IDC स्कूल ऑफ डिझाइनला ही संख्या १०० पर्यंत जाण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा  Best 5G Phone: नवीन फोन खरेदी करताय? त्याआधी ‘या’ वर्षातील आतापर्यंतच्या सर्वात बेस्ट स्मार्टफोन्सची लिस्ट एकदा पाहाचSource link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments