नवी दिल्ली: Budget Drone Camera : आजकाल ड्रोन कॅमेराचे चांगले क्रेझ युथमध्ये पाहायला मिळते. प्रत्येकाला ड्रोन कॅमेरा विकत घ्यायचा असतो. कारण तो हवेत उत्तम शॉट घेऊ शकतो. पण, ड्रोन कॅमेराची सर्वात मोठी समस्या अशी आहे की जेव्हा तुम्ही तो विकत घेण्यासाठी जाता तेव्हा त्यासाठी चांगलीच मोठी किंमत मोजावी लागते . साधारणपणे ड्रोन फक्त महागड्या रेंजमध्ये आढळतात. पण, जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्ही परवडणाऱ्या किमतीत ड्रोन कॅमेरा घेण्याचा विचार करत असाल तर, काळजीचे कारण नाही. आज आम्ही तुमच्यासाठी एक स्वस्त आणि मजबूत पर्यायाविषयी माहिती घेऊन आलो आहो. पाहा डिटेल्स.
Hillstar Pioneer Foldable Remote Control Drone
Hillstar Pioneer Foldable Remote Control Drone हा एक शक्तिशाली ड्रोन आहे. जो, तुम्ही Amazon वरून सहज खरेदी करू शकता. या ड्रोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा ड्रोन पोर्टेबल आहे. तसेच, यासोबत तुम्हाला उच्च दर्जाचा रिमोट कंट्रोल मिळतो. एवढेच नाही तर त्याची रेंजही चांगली आहे. Drone चे वजन खूप जास्त नाही आणि ते तुमच्या हाताच्या तळव्यात बसते. सहज आणि सोयीस्कर, हा छोटा ड्रोन तुमच्या प्रवासातही बेस्ट पार्टनर ठरू शकतो. जो तुम्हाला तुमचे चांगले क्षण कॅप्चर करू देतो. Hillstar Pioneer Foldable Remote Control Drone चे कमी असून डिव्हाइस कॉम्पॅक्ट आणि सोयीस्कर असल्याने, तुम्ही ते कुठेही घेऊ शकता. यामध्ये एक मजबूत कॅमेरा, बॅटरी देण्यात आली आहे. ज्यामुळे तुम्ही दीर्घकाळ व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता.
विशेष काय आहे?
Hillstar Pioneer Foldable Remote Control Drone मध्ये Foldable डिझाइन, वायफाय अॅप कंट्रोल, ड्युअल एचडी कॅमेरा, हेडलेस मोड, अल्टिट्यूड होल्ड आहे. तसेच, होव्हर, 360 फ्लिप स्टंट, १ की टेक-ऑफ/लँडिंग, जेश्चर सेल्फी देखील आहे. हे डिव्हाइस सुमारे ४० -५० मीटर पर्यंत ६- ८ मिनिटे उडवता येते. त्याचा प्रायमरी कॅमेरा – ७ मेगापिक्सेल आणि सेकंडरी कॅमेरा – २ मेगापिक्सेल आहे. Hillstar Pioneer Foldable Remote Control Drone चा चार्जिंग टाइम ६० मिनिटे आहे . या ड्रोन कॅमेऱ्याचे वजन १८५ ग्रॅम तर किंमत ६, ९९९ रुपये आहे.