Tuesday, May 24, 2022
HomeTechnologyCooler Tips : जुना कूलर बनेल चकाचक, देणार AC सारखा थंड वारा,...

Cooler Tips : जुना कूलर बनेल चकाचक, देणार AC सारखा थंड वारा, फॉलो करा ‘या’ कूल टिप्स

नवी दिल्ली: Old Cooler Makeover: सध्या भारतातील अनेक राज्यांमध्ये तापमान प्रचंड वाढले आहे. काही शहरांचे तापमान ४३-४५ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. या उन्हापासून सुटका व्हावी याकरिता प्रत्येक जण Coolers, AC सारखे कुलिंग डिव्हाइसेस खरेदी करतांना दिसून येत आहे. तुमच्याही शहरातीलत तापमान वाढले असेल. पण, नवीन कूलर खरेदी करण्याचा तुमचा प्लान नसेल तर टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण, येथे आम्ही तुम्हाला जुन्या कुलरचा मेकओव्हर करण्याच्या काही टिप्स देणार आहोत. ज्यामुळे जुनाच कूलर तुम्हाला एसीसारखा थंड वारा देईल. महत्वाचे म्हणजे, नवीन कुलर खरेदी करायचा तर, त्याची किंमत किमान ५,००० ते १०,००० रुपयांपर्यंत असते आणि जर तो खराब झाला तर तुम्हाला त्याच्या देखभालीचा खर्च देखील करावा लागतो. अशात, तुम्ही घरी असलेला जुना कूलर फेकून न देता कमी खर्चात अगदी नवीन सारखा बनवू शकता. यासाठी काही सोप्प्या टिप्स फॉलो कराव्या लागतील. त्याबद्दल जाणून घेऊया.

हेही वाचा  Flipkart Sale: अवघ्या ६,९९९ रुपयांमध्ये घरी येईल मॉडर्न फीचर्ससह पॅक्ड Smart TV, 'ही' कंपनी देतेय खास ऑफर, पाहा डिटेल्स

जुना कुलर स्वच्छ करून त्याला रंग द्या:

जुना कुलर स्वच्छ करून त्याला रंग द्या. यामुळे कूलरची बॉडी मजबूत होईल. तसेच, कूलरमधील अस्वच्छतेसोबत बॅक्टेरियाही निघून जातील. यासोबतच कूलरच्या पॅडचे ग्रास देखील बदला.

हेही वाचा  Sony Smart TV: घरच बनेल थिएटर! Sony ने भारतात लाँच केले मोठ्या स्क्रीनसह येणारे ५ स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या फीचर्स-किंमत

कूलरच्या फॅनची सर्व्हिसिंग करा:

कुलर सुरू करण्यापूर्वी त्याच्या फॅनची सर्व्हिसिंग करून घ्या. कारण, अनेक वेळा पंख्याची मोटार योग्य देखभाली अभावी जॅम होते. जर तुम्ही जॅम झालेल्या मोटारला विजेने चालवण्याचा प्रयत्न केला तर, ती खराब होण्याची शक्यता वाढेल. त्यामुळे कुलर साफ केल्यानंतर पंख्याची सर्व्हिसिंग करून घ्या.

हेही वाचा  'जी-पॅट'च्या निकालात घोळ; जाहीर झालेला निकाल वेबसाइटवरून गायब!

सबमर्सिबल पंप तपासा:

कूलरच्या टाकीमध्ये जर लिकेज असेल तर, तिथे M-सील लावा. त्यामुळे कुलरच्या टाकीतून बाहेर पडणारे पाणी थांबेल. यासोबतच कुलरला पाणीपुरवठा करणारा सबमर्सिबल पंप तपासा. जर सबमर्सिबल पंप नीट काम करत नसेल तर, बाजारातून नवीन सबमर्सिबल पंप खरेदी करून कूलरमध्ये बसवा. या सर्व कामानंतर तुमच्या रद्दीत पडलेला कुलर नवीन तर असेलच पण, AC सारखा थंड वारा देखील तुम्हाला मिळेल.Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments