Tuesday, May 24, 2022
Homeमनोरंजनहृषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव का निघाले 'छुपे रुस्तम', उद्या मिळेल उत्तर

हृषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव का निघाले ‘छुपे रुस्तम’, उद्या मिळेल उत्तर

मुंबई- लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशा तीनही प्रांतात मुशाफिरी करत अभिनेते हृषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव यांनी आजवर प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन केले आहे. सध्या नाटयवर्तुळात हे दोघेही छुपे रूस्तम असल्याची चर्चा रंगली आहे. आता या दोघांना छुपे रूस्तम का म्हटल जातंय? नेमकी कोणती भानगड या दोघांनी केली आहे? या सगळ्याचा खुलासा येत्या १५ मे ला होणार आहे. हे दोन्ही हरहुन्नरी अभिनेते आगामी ‘छुपे रुस्तम’ या नाटकासाठी एकत्र आले आहेत.

हेही वाचा  'नफरत का जवाब नफरत से मिलेगा'; अबू आझमी यांचा राज ठाकरे यांना टोला

प्रवेश व दिशा निर्मित आणि विजय केंकरे दिग्दर्शित हे दोन अंकी नाटक १५ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हृषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव ही जोडगोळी एकत्र येणार म्हणजे काहीतरी खुमासदार असणार हे वेगळं सांगायला नको. फार्स, गंमत, गॅासिप लपवाछपवी अशा सगळ्या गोष्टींनी हे नाटक रंगत जात. खास विजय केंकरे टच असलेल्या या नाटकात काम करणे ही आमच्यासाठी पर्वणी असल्याचे हे दोघे सांगतात.

हेही वाचा  Plumbing Course: इंजिनीअरिंग आणि आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांसाठी प्लंबिंगचा अभ्यासक्रम
छुपे रुस्तम

शंभर टक्के खरं कधीच कोणी बोलत नसतं. प्रत्येकजण काही ना काही लपवाछपवी करत असतो. ही लपवाछपवी जर नवरा बायको मधली असेल तर मग सगळा मामला कठीण होऊन बसतो. नवरा बायकोच्या नात्यातील लपवाछपवीचा हा खेळ आणि त्यातून उडणारी तारांबळ, तारेवरची कसरत, झालेली गोची याची सगळी धमाल म्हणजे ‘छुपे रुस्तम’ हे नाटक. ‘द लाय’ या फ्रेंच नाटकावर हे नाटक बेतलं आहे. हृषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव या दोघांसोबत मयूरा रानडे आणि कृष्णा राजशेखर या नाटकात काम करतायेत. विनोदाचा डोस देत नवरा बायकोच्या नात्यातील अंतरंग उलगडण्याचा प्रयत्न ‘छुपे रुस्तम’ हे नाटक करतं.

हेही वाचा  मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला लेकीचा फोटो, चाहत्यांकडून लाइक्सचा वर्षाव

रविवार १५ मे दुपारी ४.१५ वा. दिनानाथ नाट्यगृह विलेपार्ले आणि सोमवार १६ मे दुपारी ३.३० वा. शिवाजी मंदिर दादर येथे या नाटकाच्या शुभारंभाचे प्रयोग होणार आहेत.Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments