द आर्चिज या कॉमिक्सवर आधारीत सिनेमातून शाहरुखची मुलगी सुहाना तिचे बॉलिवूड पदार्पण करत आहे. नुकतंच या सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं. ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. द आर्चिज या कॉमिक्समधील पात्रांना भारतील लुक देत प्रयोगशील दिग्दर्शिक झोया अख्तरने हा सिनेमा हातात घेतला आहे. श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. तीन स्टार किडस या सिनेमातून त्यांचे बॉलिवूड डेब्यू करत असल्याने हा सिनेमा चर्चेत आहे. या निमित्तानेच शाहरुख खानने एक खास पोस्ट लेकीसाठी लिहिली आहे. त्याचं हे टवीट व्हायरल होत आहे.
सुहानाची आई गौरी खान हिनेही द आर्चिज या सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या सिनेमातील सर्वच कलाकारांना तिने आशीर्वाद दिले आहेत. सुहाना, तू करून दाखवलंस अशा शब्दात गौरी खाननेही पोस्ट केली आहे.