Tuesday, May 24, 2022
Homeमनोरंजनशाहरुखच्या लाडक्या अबरामनं जिंकली सगळ्यांची मनं, तुम्हालाही आवडेल हा Video

शाहरुखच्या लाडक्या अबरामनं जिंकली सगळ्यांची मनं, तुम्हालाही आवडेल हा Video


मुंबई : स्टार्सची मुलं मोठी होत आहेत. साहजिकच चाहत्यांचं त्यांच्याकडे लक्ष जातंच. छायाचित्रकार त्यांचे फोटो काढायला मागे मागेच असतात. असाच एक स्टार किड आहे, तो म्हणजे अबराम. शाहरुख खान आणि गौरी खानचं लाडकं शेंडेफळ. अबराम आपल्या आईच्या म्हणजे गौरी खानच्या स्टोअरमध्ये शिरत असताना फोटोग्राफर्सनी त्याला थांबवलं. आईनं परवानगी दिल्यावर ८ वर्षाचा अबराम पोज देऊ लागला. या गोंडस मुलानं सगळ्यांचीच मनं जिंकली.

इन्स्टाग्रामवर शेअर झालेल्या या व्हिडिओत अबराम लाजरा असल्याचं दिसतंय. कॅमेऱ्यासमोर त्याला फारशी सवय नाही. एक जण म्हणाला, हा मोठा झाला. तर दुसरा म्हणाला, हा तर छोटा शाहरुख आहे.

हेही वाचा  'पुन्हा प्रेक्षकांचं भरभरून प्रेम अनुभवतेय, उज्ज्वला जोग यांनी व्यक्त केल्या भावना

हॉलिवूडसाठी बॉलिवूड सोडणार नाही, महेशबाबू वादानंतर शाहरुखचा जुना Video Viral


हा व्हिडिओ पाहताच युझर्सनीही कमेंट केल्यात. एक जण म्हणाला, याला स्टार किड असल्याचा अजिबातच अॅटिट्युड नाही. किती गोड आहे हा.

शाहरुख खानची मुलगी सुहानाखानही चर्चेत आहे. नेटफ्लिक्सवरच्या द आर्चिस या तिच्या पहिल्या सिनेमाचा टीझर समोर आलाय. आई गौरी खान जाम आनंदात आहे. तिनं लाडक्या लेकीला सोशल मीडियावर शुभेच्छाही दिल्या आहेत.


‘द आर्चीज’ या सिनेमात सुहाना खान वेरोनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर खुशी बट्टी आणि अगस्त्य नंदा आर्ची एंड्रयूसच्या भूमिकेत दिसणार आहे आणि जहान कपूर जगहेड जॉन्सच्या भूमिकेत दिसणार आहे.

अचानक मोडलं नाही सोहेल- सीमाचं लग्न, ३ महिन्यांपूर्वी दिलेली हिंट

शाहरुख खानही हल्ली बराच चर्चेत आहे. ३ मे २०२२ मध्ये फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्र्यांनी बॉलिवूडच्या या सुपरस्टारला फ्रान्समधील प्रतिष्ठीत असा नागरी सन्मान the Légion d’Honneur हा सन्मान दिला. हा कार्यक्रम ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये आयोजित केला होता. त्यानंतर फ्रान्सच्या कौन्सिल जनरलनं ट्विट करून ही माहिती दिली.

भारताचं नाव घेतलं जाईल, तेव्हा बॉलिवूडचंही नाव घेतलं जाईल | सुनील शेट्टी

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments