Tuesday, May 24, 2022
HomePopular Postsराज ठाकरे केतकी चितळेच्या पोस्टवर संतापले, म्हणाले...

राज ठाकरे केतकी चितळेच्या पोस्टवर संतापले, म्हणाले…


मुंबई: अभिनेत्री कितके चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी समाचार घेतला आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विट करून या प्रकाराचा निषेध केला आहे. कोणीही महाराष्ट्राची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये, हीच अपेक्षा, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. कोणीतरी केतकी चितळे (Ketki Chitale) नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी श्लोकासारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे असं नाव टाकलं आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – ‘ही तर महाराष्ट्राला लागलेली कीड’; केतकी चितळेविरोधात राष्ट्रवादीची पुण्यातही तक्रार

हेही वाचा  केंद्र सरकार पाठोपाठ ठाकरे सरकारनेही करुन दाखवलं, पेट्रोल डिझेल स्वस्त, सर्वसामान्यांना दिलासा

पत्रात नेमकं काय म्हटलंय?

“कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी श्लोकासारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे असं नाव टाकलं आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.

महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्ष कार्यरत असलेल्या शरद पवारांविरूध्द तिनं किंवा त्या भावेनं हे लिहिणं साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो, त्यातली विनोदबुध्दीही आपण ओळखतो.. तशा टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत..! आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरूर आहेत आणि रहातील, परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे इथे फार स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. असं लिहिणं ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे, तिला वेळीच आवर घालायला पाहिजे.

हेही वाचा  लालमहाल नाच-गाण्यांच्या चित्रीकरणाची जागा नव्हे, दोषींवर कारवाई करा, उदयनराजे संतापले

“चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं हेच आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या महापुरुषांनी, संतांनी तसेच असंख्य बुद्धीमान विचारवंतानी आपल्याला शिकवलं! कोणीही ह्या राज्याची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये हीच अपेक्षा!”

हेही वाचा – ‘मी जर पूर्वीचा जितेंद्र आव्हाड असतो तर…’, केतकीच्या पोस्टनंतर आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया

हेही वाचा  पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी, कामशेत बोगद्याजवळ बसचा टायर फुटल्याने गाड्यांचा रांगा

“पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्ती ह्या खरंच आहेत की नवा वाद उकरून काढण्यासाठी कोणाची तरी उठाठेव सुरू आहे हे देखील तपासणे गरजेचे आहे! कारण ह्या अशाच चार-दोन विकृत टाळक्यांमुळे समाजा- समाजामध्ये तेढ निर्माण होते, समाज दुभंगतो. द्वेषाची पातळी किती खालपर्यंत आली आहे हे आता राज्यकर्त्यांनाही समजलं असेलच. हे सगळं महाराष्ट्रात वेळीच आवरणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. म्हणूनच, राज्यसरकारनं ह्याचा नीट छडा लावून ह्या गोष्टींचा ताबडतोब बंदोबस्त करावा”.

‘पवारांवरील टीका म्हणजे विकृती’; केतकी चितळेच्या पोस्टवरुन जितेंद्र आव्हाड बरसले!



Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments