Tuesday, May 24, 2022
HomePopular Postsमहाराष्ट्राला सुन्न करणारी बातमी; ३ मायलेकी आणि २ बहिणींचा दुर्देवी अंत, क्षणात...

महाराष्ट्राला सुन्न करणारी बातमी; ३ मायलेकी आणि २ बहिणींचा दुर्देवी अंत, क्षणात संपलं आयुष्य

परभणी : महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीमध्ये समोर आली आहे. पाझर तलावात धुणे धुण्यासाठी गेलेल्या ५ महिलांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पालम तालुक्यातील रामापूर तांडा आणि पिराचा तांडा येथील उस तोडीसाठी गेलेल्या ३ मायलेकी व २ बहिणी अशा ५ जणींचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

हेही वाचा  ४ तास बँकेत बसली मग वृद्धासोबत गाठलं घर; १७ वर्षीय तरुणीचा प्रताप वाचून हादराल

मिळालेल्या माहितीनुसार, पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना १४ मे रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे दोन्ही गावावर शोककळा पसरली असून स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पालम तालुक्यातील बनवस परिसरातील रामापूर तांडा व पिराचा तांडा येथील काही मजूर कुटुंबासह बालाघाट सिद्धी शुगर सहकारी साखर कारखाना येथे गेले होते.

चक्रावले
घरातील धुणे धुण्यासाठी मायलेकी व दोन बहिणी या पाझर तलावाकडे गेल्या होत्या. मागील काही दिवसात कॅनालला पाणी आल्याने या पाझर तलावात पाणी पातळी वाढली होती. त्यामुळे रामपूर तांडा येथील राधाबाई धोंडीबा आडे, त्यांच्या मुली दिक्षा आडे, काजल आडे आणि पिराचा तांडा येथील सुषमा संजय राठोड व अरुणा गंगाधर राठोड यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

हेही वाचा  औरंगाबादमध्ये भरदिवसा हत्येचा थरार, कॉलेजजवळून ओढत नेत विद्यार्थिनीचा खून

स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले असून मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह परभणीच्या पालम तालुक्यातील रामापूर तांडा व पिराचा तांडा इथं आणलं जाणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे रामापूर तांडा व पिराचा तांडा या दोन्ही गावावर शोककळा पसरली आहे. तर घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा  ओबीसी भाजपचा डीएनए, आरक्षणासाठी ठाकरे सरकारविरोधात लढा तीव्र करणार: फडणवीसSource link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments