उद्धव ठाकरे यांनी शिवसंपर्क अभियानातील सभेत बोलताना भाजप आणि मनसेवर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील सरकार मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देत नाही, कांजूरमार्गची जागा अडवून बसलंय, अशी टीका केली.
हायलाइट्स:
- उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
- लगे रहो मुन्नाभाईचा दाखला देत राज ठाकरेंवर टीका
- राज्यातील मंदिरांच्या विकासात पुरातत्त्वचा अडथळा
आम्ही शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतील माती घेऊन अयोध्येला गेलो होतो. २०१९ मध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल राम मंदिराच्या बाजूनं लागला. २०१९ मध्ये मी मुख्यमंत्री झालो. प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं काम महाविकास आघाडी सरकार करत आहे. आम्ही आठ मंदिरं निवडली आहेत. केंद्रांतल्या पुरातत्व खात्यानं त्यात खोडा घातला आहे. मंदिरांचा आम्ही जीर्णोद्धार करतोय, मंदिर दीर्घकाळ टिकेल यासाठी प्रयत्न करतोय. पुरातत्व विभाग औरंगजेबाच्या थडग्याचा सांभाळ करतोय, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची मातृभाषा तिला अभिजात भाषेचा दर्जा सरकार देत नाही, हे करंट्यांंचं सरकार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्यासाठी जावेद मियादाँद आला होता. बाळासाहेबांनी त्याला तु स्टेडियमवर माकडचाळे करतो, असा सवाल केला. क्रिकेटमध्ये स्लेजिंग म्हणतात, असा दाखला देत उद्धव ठाकरेंनी किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली. महाराष्ट्रातील जनतेला मी धन्यवाद देतो. करोनाच्या संकटाच्या काळात तुम्ही सहकार्य करत आहात त्याबद्दल मी आभार मानतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : uddhav thackeray said we decided to protect eight temples but archeology department made obstacles in work
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network