Tuesday, May 24, 2022
HomePopular Postsकोल्हापूरच्या कस्तुरीने सर केले एव्हरेस्ट शिखर; यापूर्वी ठरली होती 'अन्नपूर्णा' सर करणारी...

कोल्हापूरच्या कस्तुरीने सर केले एव्हरेस्ट शिखर; यापूर्वी ठरली होती ‘अन्नपूर्णा’ सर करणारी सर्वांत तरुण गिर्यारोहक

कोल्हापूर : कोल्हापूरची कन्या कस्तुरी दिपक सावेकर हिने शनिवारी जगातील सर्वोच्च शिखर ‘माऊंट एव्हरेस्ट’ सर करत कोल्हापूरच्या इतिहासात मानाचा तुरा रोवला आहे. कस्तुरी हिने सकाळी ६ वाजता ‘माऊंट एव्हरेस्ट’वर भारताचा तिरंगा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असणारा भगवा झेंडा फडकवला आणि अनेक वर्षे तिने ज्या स्वप्नपूर्तीसाठी प्रचंड मेहनत घेत होती, ते स्वप्न साकार झाले. ही कामगिरी करणारी ती कोल्हापूरची पहिली कन्या असून जगभरातील २० गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट सर केले असून एव्हरेस्ट सर करण्याऱ्या टीममधील ती एकमेव भारतीय आहे.

हेही वाचा  धनुषच आमचा मुलगा आहे, जोडप्याने केलेला दावा; अभिनेत्यानं केली कायदेशीर कारवाई

कस्तुरी सावेकर हिला लहानपणापासून गड किल्ले सर करण्याची आवड असल्याने राजगडसह अनेक मोहिमेत ती यशस्वी झाली. तिचे माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न होते. मागील वर्षी मे महिन्यात तिने हे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पण मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात खराब वातावरणामुळे तिला ही मोहीम अर्ध्यावर सोडावी लागली. तरीही तिने जिद्द सोडली नाही. आर्थिक परिस्थिती नसतानाही तिच्या वडिलांनी या मोहिमेसाठी लागणारा खर्च उभा केला. यातून ती पुन्हा एव्हरेस्ट मोहिमेसाठी सज्ज झाली.

हेही वाचा  अजय देवगणची लेक नीसाचा बोल्ड लुक पाहिला का? लंडनमध्ये सुरू आहे धमाल, Photo Viral

या मोहिमेसाठी २४ मार्च रोजी ती पुन्हारवाना झाली. २८ एप्रिलला तिने अन्नपूर्णा शिखर सर केले. ४ मे रोजी तिने एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठला. सोमवार दिनांक ९ रोजी पुन्हा चढाई सुरू करत ती १२ मे रोजी बेस कॅम्प तीन येथे पोहोचली. शुक्रवारी रात्री शेवटची चढाई सुरू करत शनिवारी पहाटे तिने एव्हरेस्टवर तिरंगा फडकावला आणि कोल्हापूर जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली. कस्तुरी ही माऊंट एव्हरेस्टच्या आधी अन्नपूर्णा शिखरावर चढणारी जगातील सर्वात तरुण महिला गिर्यारोहक ठरली होती. तिने आज माऊंट एव्हरेस्टवर तिरंगा फडकावून कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कस्तुरीने हे यश राजर्षी शाहू महाराजांना समर्पित केलं आहे.

हेही वाचा  पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी केले, राज्याच्या तिजोरीवर वर्षाला २५०० कोटी रुपये भार पडणारSource link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments