शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांसमोर मार्गदर्शन करताना बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, महाविकास आघाडी सरकारचं काम यावर भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजप आणि राज ठाकरेंवर नाव न घेता टीका केली.
नवहिंदूत्त्वाद्यांना आता राम आठवला. इतर लोकांसाठी राम हा राजकारणाचा विषय असू शकतो. अयोध्या इतरांसाठी राजकारणाचा विषय असू शकतो. आमच्यासाठी तो श्रद्धेचा विषय आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात आपण सरकार चालवत आहोत. विकासाचा गाडा आपण पुढं नेत आहोत. सावरकरांनी हिंदुत्त्वाची व्याख्या सांगितली होती. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील कामांचा फायदा सर्व धर्मियांना होत आहे. प्रत्येकाला काम आणि पोटाला अन्न देणारं आमचं हिंदुत्त्व आहे. भांडणं लावणारं आमचं हिंदुत्त्व नाही.इडा पीडा मागं लागली म्हणून शिवसेना घाबरणार नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे सैनिक आहोत. आम्ही घाबरणार नाही. केंद्रीय यंत्रणा माग लागल्या तरी आम्ही घाबरणार नाही. विकासकामं हाच आमचा बाप आहे. विकासकामं पूर्ण होतील त्यावेळी महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलेला असेल, असं एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं समृद्धी महामार्ग करत आहोत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
शिवसेनेची जाहीर सभा लाईव्ह
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : eknath shinde said pakistan fear name of balasaheb thackeray
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network