Tuesday, May 24, 2022
HomePopular Posts'आम्ही केतकीला चोप दिला'; राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी घेतली शाईफेकीची जबाबदारी

‘आम्ही केतकीला चोप दिला’; राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी घेतली शाईफेकीची जबाबदारी


नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्यानंतर वादात सापडलेल्या अभिनेत्री केतकी चितळेवर शाईफेक करण्यात आली आहे. कळंबोली पोलीस ठाण्याबाहेर ही घटना घडली असून यावेळी तिला धक्काबुक्कीही करण्यात आली. राष्ट्रवादी युवती काँग्रेसने या सर्व प्रकाराची जबाबदारी घेतली आहे. ‘केतकीसारख्या विकृत व्यक्तीला आम्ही अंड्यांचा प्रसाद आणि चोप दिला आहे. आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर वरिष्ठ नेत्यांवर जर कोणी चुकीच्या शब्दांत टीका केली तर आम्ही घरात घुसून धडा शकवल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पदाधिकारी मनाली भिलारे यांना दिला आहे.

हेही वाचा  Smartphone Launch: आणखी एका स्वस्त स्मार्टफोनची एन्ट्री, ९,००० रुपयांपेक्षा कमीमध्ये Infinix Hot 12 Play भारतात लाँच

केतकी चितळे हिच्यावर वादग्रस्त पोस्ट शेअर केल्याने कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानतंर ठाणे गुन्हे शाखा तिचा शोध घेत होती. त्यानंतर दुपारी ४ वाजताच्या सुमारास कळंबोलीच्या आयवीलॉन्स सोसायटीमधील घरातून तिला अटक करण्यात आली. कळंबोली पोलीस ठाण्यात केतकीचा जबाब नोंदवण्यात आला. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठाणे गुन्हे शाखेचे पथक तिला ठाण्यात घेऊन जात असतानाच पोलीस ठाण्याबाहेर जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी ‘फायर आजी’ कडाडल्या, म्हणाल्या…

हेही वाचा  प्रियांकाच्या कार कलेक्शनमध्ये आली अजून एक कस्टम मेड गाडी, निक जोनसने दिलं खास गिफ्ट

पोलीस ठाण्याबाहेर काही महिलांनी केतकी हाय-हाय अशा घोषणा देत तिच्या अंगावर शाईफेक केली. यावेळी तिला धक्काबुक्की झाल्याचंही सांगितलं जात आहे. या प्रकारामुळे आधीच चर्चेत असलेला हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे.

हेही वाचा  "राज ठाकरे भरकटलेले नेते, त्यांना कधीच शरद पवार होता येणार नाही"Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments