Tuesday, May 24, 2022
HomePopular Postsआजची सभा काय सांगते, मुंबईचा बाप शिवसेना असल्याचं सांगते, संजय राऊत यांनी...

आजची सभा काय सांगते, मुंबईचा बाप शिवसेना असल्याचं सांगते, संजय राऊत यांनी ठणकावलं


मुंबई : आपल्या तोफा नेहमी धडाडत असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खूप मोठा दारुगोळा घेऊन स्टेजवर येणार आहेत. खऱ्या तोफा काय आहेत हे महाराष्ट्राला आज समजणार आहे. वांद्र्यात सुरु झालेल्या सभेचं टोक कुर्ल्यात आहे. आजची सभा १०० सभांची बाप आहे. आजची सभा सांगते मुंबईचा बाप शिवसेना आहे. कुणाला आजमवायचं असेल तर येऊन पाहा, असं संजय राऊत म्हणाले. आमचा बाप बाळासाहेब ठाकरे हे आहेत. आजची सभा सांगते महाराष्ट्र आणि शिवसेना कुणासमोर झुकणार नाही. लोकं म्हणतात संघर्षा के आगे जित आहे. हा उसळलेला हिंदू महासागरानं महाआरती सुरु केली आहे. महासागरानं महाआराती केली तर लडाखमध्ये घुसलेलं सैन्य पळून जाईल, असं संजय राऊत म्हणाले.
केंद्रीय यंत्रणांची पीडा लागली तरी शिवसेना घाबरणार नाही, एकनाथ शिंदेनी ठणकावलं
शिवसेनेचं हिंदुत्त्व हे संभाजीराजांसारखं आहे. प्राण जाय पण वचन जाय, असं आहे. काल त्या संभाजीनगर ला हैदराबादहून कोण आलं होतं. ओवेसीनं औरंगजेबाच्या कबरीपुढं माथा टेकला. आम्ही त्याचा निषेध करतो. खरी गम्मत पुढं आहे. भाजपची पिलावळ उभी राहिली, ठाकरेंच्या सरकारच्या काळात महाराष्ट्रात येतो आणि औरंगजेबापुढं नतमस्तक होतो, काय कारवाई करणार असं विचारता. काँग्रेसच्या सरकारच्या काळात आणि देवेंद्र फडणवीसाच्या काळात तो आपल्या इकडं आला होता. त्यावेळी तुम्ही का कारवाई केली नाही, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

हेही वाचा  तब्बल ९ हजाराची सूट, स्वस्त किंमतीत मिळतोय Oppo चा हा स्मार्टफोन

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी ‘फायर आजी’ कडाडल्या, म्हणाल्या…औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म महाराष्ट्रात झाला. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी भोगलं ते आज आपण भोगतोय त्याची मूळं गुजरातच्या त्या गावात आहेत. काश्मीरमध्ये गेल्या तीन महिन्यात २७ काश्मिरी पंडितांची हत्या झाली. त्या बातम्या तुमच्यापुढं येत नाहीत. परवा राहुल भट्ट या काश्मिरी पंडिताची हत्या झाली. काल आणि आज काश्मिरी पंडित रस्त्यावर उतरले त्यावेळीू केंद्रानं त्यांच्यावर अश्रूधुराच्या कांड्या फोडल्या, असं संजय राऊत म्हणाले. काल पुलगाम मध्ये दोन पोलीस अधिकारी मारले गेले. काश्मीरमध्ये धोक्याची घंटा वाजते आहे. शिवसेनेकडे बोटं दाखवू नका, शाहिस्तेखानाप्रमाणं तुमची बोटं छाटली जातील, असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा  दहावीनंतर आर्ट्स, सायन्स की कॉमर्स? कन्फ्यूज असाल तर 'येथे' मिळेल तुमचे उत्तरSource link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments