Tuesday, May 24, 2022
Homeमनोरंजनआई कुठे काय करते : आशुतोषनं डोळे उघडले, संकट टळलं; अरुंधतीचा जीव...

आई कुठे काय करते : आशुतोषनं डोळे उघडले, संकट टळलं; अरुंधतीचा जीव भांड्यात, Video Viral


मुंबई : प्रेक्षक आई कुठे काय करते मालिकेत खूपच गुंतत जातायत. त्यामुळे आशुतोषचा अपघात, त्याला गंभीर दुखापत पाहून सगळे प्रेक्षकही अस्वस्थ झाले होते. त्यात कालच्या एपिसोडमध्ये आशुतोष कोमात गेला. त्यामुळे आता पुढे काय होणार, याची चिंता प्रेक्षकांना होती. पण मालिकेत आता चांगली गोष्ट घडणार आहे.

अरुंधतीला सगळे फोन करतायत. पण ती उचलत नाही. म्हणून यश तिच्या घरी येतोय तशी अरुंधती घाबरते. तिला वाटतं यश वाईट बातमी घेऊन आलाय. पण तसं नसतं. आशुतोषला शुद्ध आली, हेच सांगायला यश आला आहे. अनिरुद्ध डोळे उघडतो. दोन शब्दही बोलतो. त्याच्या जवळ आई, नितीन आहेतच. अरुंधतीही हाॅस्पिटलमध्ये धाव घेते.


आशुतोषची आई खूश आहे. आशुतोषला आता शस्त्रक्रियेचीही गरज नाही, असं डाॅक्टरांनी सांगितलं. अरुंधती म्हणते, सगळ्यांच्या शुभेच्छा कामी आल्या. सगळ्यांनाच वाटत होतं की आशुतोषनं बरं व्हावं, जगावं. सगळे सकारात्मक विचार एकवटले आणि आशुतोष शुद्धीवर आला.

गेल्या दोन एपिसोडमध्ये हाॅस्पिटलचं वातावरण दाखवलं होतं. अगदी अनिरुद्ध देशमुखही आशुतोषला पाहायला हाॅस्पिटलमध्ये येतो. त्यावेळी अरुंधती तिला आशुतोषविषयी काय वाटतं हे अगदी मनमोकळं अनिरुद्धला सांगते. तोही ते शांतपणे, सहृदयतेनं ऐकून घेतो. तिला धीर देतो.

हळवी अरुंधती आशुतोषच्या आईला मात्र आधार देते. आशू बरा होईल म्हणून सांगत राहते. देशमुख कुटुंबही मदतीला धावून येतं. पण आता अजून एक मोठा ट्विस्ट मालिकेत दाखवला जाणार आहे. यात आशुताषची प्रकृती आणखी बिघडते. तो अत्यवस्थ होतो आणि एका फटक्यात कोमात जातो.

Source link

हेही वाचा  VIDEO: स्वामींनी आणि आईनं खूप दिलंय...अमृता पोहोचली तुळजाभवानीच्या दर्शनाला
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments