Tuesday, May 24, 2022
Homeज्योतिषराशिभविष्य 13 मे 2022

राशिभविष्य 13 मे 2022

मेष –

घर, कुटुंब आणि संतती यांच्या संबंधी आज आपणाला आनंद आणि संतोषाची भावना राहील. आज आप्त, इष्ट आणइ मित्र आपणाला घेरून टाकतील. 

वृषभ  –

व्यापार्‍यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नवीन आयोजन ते हाती घेऊ शकतील. आर्थिक लाभ प्राप्त होतील. विदेशातील मित्र किंवा नातेवाईक यांच्याकडून येणार्‍या वार्ता आपणाला भावविवश बनवतील. 

मिथुन –

अनियंत्रित रागाला लगाम घालण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. बदनामी आणि निषेधार्ह विचारांपासून दूर राहणे हिताचे ठरेल. 

कर्क –

हेही वाचा  राशिभविष्य 21 मे 2022

आजचा दिवस सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रांत आपणाला लाभदायक ठरेल. मौजमजेची साधने, उत्तम दागीने आणि वाहन खरेदी होईल. मौजमस्ती आणि मनोरंजनात वेळ खर्च होईल. 

सिंह –

श्रीगणेश सांगतात की उदासीन वृत्ती आणि संशयाचे काळे ढग आपल्या मनाला वेढून टाकतील. त्यामुळे मनःस्वास्थ्य लाभणार नाही. 

कन्या-

चिंता आणि उद्विग्नपूर्ण असणारा आजचा दिवस या ना त्या कारणाने काळजी वाढवेल. विशेषतः संतती आणि तब्बेती विषयक जास्त चिंता वाटेल. पोटाच्या तक्रारी राहतील. 

तूळ-

श्रीगणेश सांगतात की आज आपण खूप भावनाशील बनाल व त्यामुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. आईशी मतभेद होतील किंवा तिच्या तब्बेतीची काळजी राहील. 

हेही वाचा  राशिभविष्य 22 मे 2022

वृश्चिक-

कार्यात यश, आर्थिक लाभ आणि भाग्योदयासाठी दिवस शुभ आहे. नवीन कार्याचा आरंभ करू शकता. भावंडांशी अधिक सहयोगपूर्ण आणि प्रेमाचे संबंध राहतील. 

धनु-

द्विधा मनःस्थिती आणि घरातील बिघडलेले वातावरण यामुळे त्रास होईल. नाहक खर्च होईल. कामे पूर्ण व्हायला विलंब लागेल. महत्त्वाचे निर्णय घेणे हिताचे ठरणार नाही असे श्रीगणेश सांगतात. 

हेही वाचा  राशिभविष्य 24 मे 2022

मकर –

ईश्वर नामस्मरणाने दिवसाचा शुभारंभ होईल. धार्मिक कार्य, पूजा- पाठ होईल. गृहस्थी जीवनात आनंदी वातावरण राहील. आपले प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल. 

कुंभ –

कोणाला जामीन राहणे, पैसे देणे- घेणे करू नका असे श्रीगणेश सांगतात. खर्च वाढेल. तब्बेतीकडे लक्ष द्या. कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता. कोणाशी गैरसमजाने भांडण होऊ शकेल. 

मीन –

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस लाभदायक आहे. नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल. वडीलधारे आणि मित्रांकडून लाभ होईल. नवे मित्र मिळतील. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments