भारतीय शेअर बाजार गुरुवारी पुन्हा मोठी घसरण नोंदवली गेली. गेल्या काही दिवसांपासून बाजारात सातत्याने घसरण दिसून येत आहे. आज सकाळी सेन्सेक्स 53,320 वर व्यवहार करत होता. तर निफ्टी 15,956.45 च्या पातळीवर उघडला. दुसरीकडे, भारतीय रुपयाही 23 पैशांची घसरण नोंदवण्यात आली.
मुंबई : जागतिक बाजारातून सततच्या नकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार आज पुन्हा घसरणीसह उघडला. आज सेन्सेक्स 867 अंकांनी घसरून 53,320.83 वर व्यवहार करत होता. तर निफ्टी 210 अंकांनी घसरून 15,956.45 च्या पातळीवर उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात अनेक शेअर कोसळले आहेत.
बुधवारी बाजाराची स्थिती कशी होती?
याआधी बुधवारी दिवसभराच्या अस्थिरतेनंतर सेन्सेक्स 276.46 अंकांनी घसरून 54088.39 वर बंद झाला, तर निफ्टी 72.95 अंकांनी घसरून 16167.10 वर बंद झाला होता. बँकिंग क्षेत्रातील शेअर मात्र चांगल्या स्थितीत दिसले. कालच्या ट्रेडिंग सत्रात, निफ्टी 16,000 च्या खाली जाण्याच्या स्तरावर होता. पण बँकिंग क्षेत्रामुळे मजबूत सपोर्ट मिळाला होता.