गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तुम्ही आचार्य श्रीनिवास यांच्यासोबत पेन देखील पाहू शकता. व्हिडीओमध्ये आचार्य श्रीनिवास यांची टीम पेन उचलताना आणि फोटो काढताना दिसत आहे. २०११ साली बनवलेल्या या पेनची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने जगातील सर्वात मोठा बॉल पेन म्हणून नोंद केली आहे.
हा पेन उचलण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागत आहे. कारण या पेनचे वजन तब्बल ३७.२३ किलो आहे. तर हा पेन १८ फूट लांब आहे. पेनाच्या वरील भाग पितळेचा बनलेला आहे, ज्याचे वजन ९ किलो आहे.
जगातील सर्वाधिक वजनाचा पेन
दरम्यान, पेनाच्या वरच्या भागावर भारतीय धर्मग्रंथांशी संबंधित काही देखावेही तयार करण्यात आले आहेत. या प्रकारचा पेन तुम्ही याआधी कदाचित कधीच पाहिला नसेल.
दरम्यान या पेनचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तर व्हिडीओला ७१ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. तर काही सोशल मीडियावरील युजर्स हास्यास्पद प्रतिक्रिया देत आहेत, तर काही जण या पेनची तुलना मिसाईलशी करत आहेत.