Tuesday, May 24, 2022
Homeआर्थिकपंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी खास बातमी; आता डेबिट कार्ड नसलेतरी होतील कामं

पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी खास बातमी; आता डेबिट कार्ड नसलेतरी होतील कामं

देशातील दुसरी सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) PNB One या अॅपद्वारे तुमचा शॉपिंगचा अनुभव सुलभ केला आहे. तुमचे डेबिट कार्ड कुठे हरवले असेल किंवा गरजेच्या वेळी तुमच्यासोबत नसेल, तर तुम्ही PNB One अॅपद्वारे व्हर्च्युअल डेबिट कार्ड तयार करू शकता. व्हर्च्युअल डेबिट कार्ड तयार करणे अतिशय सोपं आहे. यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये PNB One अॅप असणे आवश्यक आहे, त्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू होईल.

हेही वाचा  भारतातील बँक लॉकरसाठी किती शुल्क आकारतात? जाणून घ्या महत्वपूर्ण माहिती

डिजिटल डेबिट कार्ड कसे तयार करावे?

• सर्वप्रथम PNB One अॅपवर लॉग इन करा.

• त्यानंतर होम स्क्रीनवर डेबिट कार्ड निवडा.

• यानंतर तुम्हाला व्हर्च्युअल डेबिट कार्ड स्क्रीनवर नेले जाईल जिथे तुम्हाला ‘Request Virtual Card’ हा पर्याय निवडावा लागेल.

हेही वाचा  फक्त 50 रुपये पोस्ट ऑफिस मधील योजनेत गुंतवा; मिळेल लाखोंचा फायदा

• यानंतर, नवीन स्क्रीनवर, तुमचा खाते क्रमांक आणि डेबिट कार्ड प्रकार निवडा.

• ते प्री कन्फर्मेशन स्क्रीनवर सबमिट करा.

• यानंतर, व्हर्च्युअल कार्ड अॅक्टिव्ह करा स्क्रीनवर तुमची संमती द्या आणि ट्रान्झॅक्शन पासवर्ड टाकून व्हर्च्युअल डेबिट कार्ड अॅक्टिव्ह करा.

• तुमचे व्हर्च्युअल डेबिट कार्ड तयार आहे जे तुम्ही ऑनलाइन खरेदीसाठी वापरू शकता.

हेही वाचा  BREAKING NEWS: 1993 ला झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी CBI ने 4 फरार आरोपींना केली अटक

PNB One चे इतर फायदे

या अॅपद्वारे तुम्ही मोबाईल, वीज, लँडलाइनसह अनेक प्रकारची बिले भरू शकता. येथे तुम्ही चेकची पॉझिटिव्ह पे सिस्टमसह पडताळणी करू शकता. याशिवाय पीएनबी वनद्वारे ऑनलाइन डिमॅट खाते उघडणे, इतर कोणत्याही खात्यात पैसे ट्रान्सफर करणे, सुकन्या समृद्धी योजनेसारख्या सरकारी योजनांमध्ये पैसे टाकण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments