Tuesday, May 24, 2022
Homeब्रेकिंगसाप मारून व्हॉट्सॲप स्टेटसला ठेवणं आलं अंगलट; वनविभागाने केली कारवाई

साप मारून व्हॉट्सॲप स्टेटसला ठेवणं आलं अंगलट; वनविभागाने केली कारवाई

नागपूरच्या नरखेड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका मुलाने धामण प्रजातीच्या सापाची हत्या करून त्याचे फोटो व्हाट्सअप स्टेटसवर ठेवले होते. हा प्रकार या तरुणाला चांगलाच महागात पडला आहे. याप्रकरणी, राहुल रेवतकर आणि त्याचा मित्र प्रविण मोरे या दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई वनविभागाने केली आहे.

हेही वाचा  चासकमान धरणावर एकूण ३२ विद्यार्थी गेले, परतले फक्त २८, चौघांचा बुडून मृत्यू

नेमकं काय घडलं?

धामण प्रजातीच्या सापांची हत्या करण्यात आली होती. यानंतर त्याचे फोटो व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवले गेले होते. हा प्रकार एका तरुणाला चांगलाच महागात पडला. वनविभागाने लगेच त्याची दखल घेत दोन जणांना अटक केली. राहुल रेवतकर व त्याचा मित्र प्रविण मोरे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

हेही वाचा  राजकीय नेता सोयीनं सभा घेतो, त्यावर काय भाष्य करायचं, मनसेच्या सभेवर शरद पवारांची प्रतिक्रिया


घटना नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील वडेगाव येथील आहे. गिरीश पोरांनी यांच्या शेतामध्ये धामण जातीचा साप निघाला होता. या तरुणाने सुरुवातीला त्याची हत्या केली. त्यानंतर त्या मृत सापाचे फोटो व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवला. तसेच त्याला “कोब्रा किंग का अंतिम संस्कार” असा मजकूर लिहिला. त्यानंतर वन विभागाने ही कारवाई करत दोघांना अटक केली.

हेही वाचा  १३ महापालिकांची आरक्षण सोडत १३ जूनला, मुंबईला वगळलं, निवडणूक आयोगाचं पुढचं पाऊल
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments