Tuesday, May 24, 2022
Homeज्योतिषराशिभविष्य 12 मे 2022

राशिभविष्य 12 मे 2022

मेष –
कोणत्याही प्रकारच्या संकटात न पडण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. व्यवसायात वरिष्ठांशी प्रेमाने वागून कार्य पूर्ण करून घ्या. वाद घालत बसणे हिताचे नाही.

वृषभ –
आपला हळवेपणा आपणाला बेचैन करील . शरीर स्वास्थ्यावरही त्याचा नकारात्मक परिणाम होईल. नवे कार्य आज सुरू करू नका. उक्ती आणि कृतीवर नियंत्रण ठेवा.

मिथुन –
आज हर्ष- आनंदात स्वतःला हरवून जाण्याचा दिवस आहे . मनोरंजनाच्या ‘मूड’ मध्ये राहाल. मित्रांसह प्रवास- सहलीचे योग येतील.

हेही वाचा  राशिभविष्य 21 मे 2022

कर्क –
व्यवसायात अनुकूल वातावरण राहील, असे श्रीगणेश सांगतात. माहेरहून आनंदाच्या वार्ता मिळतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील.

सिंह –
प्रणयासाठी दिवस अनुकूल आहे. रागावर नियंत्रण ठेवा. पोटाच्या व्याधी त्रास देतील. दुपारनंतर घरात आनंद- उत्साहाचे वातावरण राहील.

कन्या-
आज शारीरिक स्वास्थ्य, मानसिक तरतरी आणि चेतना शक्तीचा अभाव राहील. सामाजिक स्तरावर अपमान होणार नाही याची काळजी घ्या.

तूळ-
नवे कार्य हाती घेण्यास दिवस शुभ आहे. प्रिय व्यक्तीच्या भेटीने आनंद होईल. भाग्योदय होईल. समाजात मान- सन्मान मिळतील. दुपारनंतर मात्र मनात औदासिन्य पसरेल.

हेही वाचा  राशिभविष्य 23 मे 2022

वृश्चिक-
ठरवलेले काम पूर्ण न झाल्याने निराशा येईल. कोणत्याही महत्त्वाच्या कामाचा अंतिम निर्णय घेऊ नये असा सल्ला श्रीगणेश देतात. घरगुती वातावरण क्लेशदायी राहील.

धनु-
आजचा दिवस आपणासाठी शुभ फलदायी आहे कामेपूर्ण होतील आणि धनप्राप्ती होईल. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या उत्साही आणि ताजेतवाने राहाल.

मकर –
बोलणे आणि वागणे यामुळे भांडण होणार नाही याची दक्षता घ्या. संतापाचे प्रमाण वाढेल. पण कोणाशी वाद वा मतभेद होऊ देऊ नका. मन व्यग्र राहील.

हेही वाचा  राशिभविष्य 22 मे 2022

कुंभ –
सर्व दृष्टींनी आजचा दिवस लाभदायक ठरेल असे श्रीगणेश सांगतात. सामाजिक क्षेत्रात आपण सक्रीय राहाल आणि परिणाम स्वरूप मान प्रतिष्ठा वाढेल.

मीन –
आजचा दिवस आपणाला सर्व दृष्टींनी लाभदायक आहे. परोपकाराचे कार्य हातून घडेल. व्यापारात सुयोग्य नियोजनामुळे व्यापार वृद्धी करू शकाल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments