Tuesday, May 24, 2022
HomeTechnologyUPI क्यूआर कोडच्या माध्यामातून फ्रॉड होण्यापासून 'असं' वाचवा

UPI क्यूआर कोडच्या माध्यामातून फ्रॉड होण्यापासून ‘असं’ वाचवा

QR कोड घोटाळा टाळण्यासाठी काही खास मार्ग आहेत. सायबर तज्ज्ञांच्या मते, या गोष्टींचा अवलंब करून तुम्ही सायबर फसवणूक टाळू शकता.

खालील प्रकार लक्षात ठेवा

रिमोट ऍक्सेस देणे:

सायबर तज्ञांच्या मते, अनव्हेरिफाइड अॅप डाउनलोड केल्याने त्यांना डिव्हाइसवर रिमोट ऍक्सेस मिळतो. याचा वापर फसवणूक करणारे UPI द्वारे पैसे चोरण्यासाठी करू शकतात.

हेही वाचा  नव्या शाळांच्या प्रस्तावांची कसून तपासणी होणार, शिक्षण विभागाचा महत्वाचा निर्णय

बी फिशिंग घोटाळा:

काही अनव्हेरिफाइड पेमेंट लिंक एसएमएसद्वारे मोबाइलवर पाठवल्या जातात. लिंकवर क्लिक करून, मोबाइल वापरकर्त्यांना त्यांच्या फोनवरील UPI पेमेंट अॅपवर नेले जाते. ते तुम्हाला ऑटो डेबिटसाठी कोणतेही अॅप निवडण्यास सांगेल. परवानगी दिल्यानंतर लगेचच तुमच्या खात्यातून रक्कम कापली जाईल. त्यामुळे असे एसएमएस टाळा.

हेही वाचा  Digilocker: आता WhatsApp च्या एका क्लिकवर डाउनलोड करा महत्त्वाची कागदपत्रं, स्टेप बाय स्टेप असं जाणून घ्या

OTP आणि PIN शेअरिंग:

RBI ने वारंवार चेतावणी दिली आहे की, ग्राहकांनी त्यांचा UPI पिन किंवा OTP कोणाशीही शेअर करू नये. असे असूनही, काही फसवणूक करणारे ग्राहकांना त्यांच्या फोनवर मिळालेला OTP शेअर करण्याचे आमिष दाखवण्यात यशस्वी होतात. ते शेअर केल्यानंतर, फसवणूक करणारे बेकायदेशीर व्यवहार प्रमाणित करू शकतात आणि पैसे चोरू शकतात.

हेही वाचा  Sim Card: तुमच्या नावावर किती जणांनी घेतले आहे सिम कार्ड? या सोप्या प्रोसेसने मिळेल संपूर्ण माहिती

फेक हँडल:

काही स्मार्ट हॅकर्स त्यांच्या UPI सोशल पेजेसवर BHIM किंवा SBI सारखी नावे वापरतात जेणेकरून ते विश्वसनीय UPI प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे UPI वापरकर्त्यांनी या फसवणुकीपासून सावध राहावे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments