क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आणि गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्ज त्यांच्या नवजात मुलाच्या मृत्यु झालाय यांसंदर्भात क्रिस्टियानो रोनाल्डोने याने इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत आपल्या नवजात मुलाच्या मृत्यूची माहिती दिली.
सोमवारी क्रिस्टियानो रोनाल्डोने सोशल मीडियावर एक हृदयद्रावक पोस्ट शेअर केली. यात त्याने त्यांच्या नवजात जुळ्या मुलांपैकी एक लहान मुलाचा मृत्यु झाल्याचे माहिती दिली.
रोनाल्डोने लिहिले, “आमच्या लहान मुलाचे निधन झाल्याचे अत्यंत दु:खासह मला सांगावं लागत आहे कोणत्याही पालकांसाठी ही सर्वात मोठी दु:खद गोष्ट आहे. रोनाल्डोने लिहिले. केवळ आमची मुलगी हा क्षण काही आशा आणि आनंदाने जगण्याची शक्ती देत आहे.”
रोनाल्डोने काळजी आणि देखरेखेसाठी त्यांच्या डॉक्टरांचे आभार मानले. या अत्यंत कठीण काळात आम्ही नम्रपणे गोपनीयतेची विनंती करतोय, असेही रोनाल्डो म्हणाला.