मेष
मानसिकदृष्टया थकवा जाणवेल. अधिक कष्ट करूहन त्यामानाने प्राप्ती कमी होईल. संतती विषयी काळजी राहील .
वृषभ
आज आपण कोणतेही कार्य खंबीर मनोबल आणि दृढ आत्मविश्वास यांच्या जोरावर पूर्ण कराल. पैतृक घराण्याकडून आपणाला लाभ होईल.
मिथुन
सरकारी लाभ होतील. वरिष्ठ अधिकार्यांकडून तुमच्या कामाचे योग्य मूल्य मिळेल. भावंडे आणि शेजारी- पाजारी यांच्याशी झालेले गैरसमज दूर होतील.
कर्क
शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आज मिळणार नाही. निराशा आणि असंतोषाची भावना मनात राहील. कुटुंबियांशी गैरसमज होणार नाहीत या विषयी लक्ष द्या.
सिंह
कोणतेही काम करण्याचा निर्णय आपण झटकन ध्याल. वडील आणि वडीलधार्यांकडून लाभ होतील. सामाजिक मान- मरातब वाढेल.
कन्या
आपल्या अहंपणाचा दुसर्या व्यक्तीच्या अहंपणाशी संघर्ष होणार नाही याकडे लक्ष देण्याचा सल्ला आहे. शारीरिक थकवा व मानसिक तणाव वाढेल. एखाद्या गोष्टीवरून मित्रांबरोबर गैरसमज होतील.
तूळ
वेगवेगळ्या क्षेत्रातून झालेल्या लाभातून आपल्याला समाधान मिळेल. मिळकतीत वृद्धी. मित्रांकडून फायदा होईल पण त्यांच्यासाठी खर्च ही होईल. एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देण्याने तुम्ही रोमांचित बनाल.
वृश्चिक
आजचा दिवस आपणास शुभफलदायी आहे. नोकरी व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. वरिष्ठ अधिकारी आपल्यावर प्रसन्न असतील. प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल. मान व प्रतिष्ठा वाढेल.
धनु
आळस व अशक्तपणा जाणवेल. मनाला चिंता लागून राहील. व्यावसायिक दृष्टया अडथळे येतील. संकटाविषयीच्या विचारापासून दूर राहा.
मकर
आज अचानक पैसा खर्च होण्याचे योग आहेत. हा खर्च आजारपणावर, व्यावहारिक किंवा सामाजिक कामासाठी बाहेर जावे लागल्यामुळे होऊ शकतो. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या.
कुंभ
प्रत्येक काम आपण आत्मविश्वापूर्वक कराल. प्रवास, सहलींची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजन व नवीन वस्त्रपरिधान करण्याचे आज योग आहेत.
मीन
आपले मनोबल आणि आत्मविश्वास दृढ बनेल. शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील. घरात सुखशांती नांदेल. स्वभावातील तापटपणामुळे संयम ठेवण्याचा प्रयत्न करा.