Tuesday, May 24, 2022
HomeUncategorisedराशिभविष्य 20 जानेवारी 2022

राशिभविष्य 20 जानेवारी 2022

मेष-

‘ऐकावे जनाचे ‘करावे मनाचे’ असे धोरण ठेवा. भाग्याची साथ राहील. तुमचे महत्त्व वाढेल. नावलौकिक वाढेल. आर्थिक बाजू चांगली राहील. वडिलोपार्जित संपत्तीच्या कामात अडचणी येतील. कौटुंबिक मतभेद होतील. खाण्या पिण्याचे तंत्र सांभाळा.

वृषभ-

अडचणी कमी होतील. मात्र, थोडा तणाव राहील. तणावाचे व्यवस्थापन नीट केले पाहिजे. मनात सकारात्मक आणि आनंदी विचार असतील तरच यशाचा आनंद लुटता येतो, हे लक्षात घ्या. दूरच्या प्रवासाचा योग, रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराच्या मताचा आदर करा.

मिथुन-

प्रेमात यश मिळेल. जोडीदाराची साथ मिळेल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. संयमाने वागण्याची गरज आहे. प्रवासात सावधानता बाळगा. सामान, कागदपत्रे सांभाळून ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. दगदग होईल अशी कामे करू नका. मुलांना यश मिळेल.

हेही वाचा  राशिभविष्य 22 मे 2022

कर्क-

अनपेक्षित लाभ होईल. काही अडचणी येतील. मात्र, आपण त्यातून मार्ग काढाल. जीवनसाथी चांगली साथ देईल. जीवनसाथीचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. आरोग्याची काळजी घ्या. खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा. आर्थिक आवक चांगली राहील.

सिंह-

नोकरीत बदली होऊ शकते. कामात थोडा तणाव राहील. वरिष्ठांशी मतभेद होतील. दगदग होईल. घरात वादविवाद होण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी गैरसमज होतील. मुलांना चांगल्या संधी मिळतील. आर्थिक आवक सामान्य राहील.

कन्या –

भाग्याची साथ मिळेल. अडचणी दूर होतील. दगदग कमी होईल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. अधिकार वाढवून मिळतील. व्यवसायात धाडसी निर्णय घेताना जाणकारांचा सल्ला घ्या. तब्येतीची काळजी घ्या.

हेही वाचा  राशिभविष्य 24 मे 2022

तूळ-

भावंडांच्या भेटीगाठी होतील. व्यवसायात भरभराट होईल. जमिनीचा व्यवहार सांभाळून करा. एखाद्या कामात दिरंगाई होईल. काही अडचणी येतील. त्यामुळे दगदग होईल. मनस्ताप सहन करावा लागेल. थोडा संयम ठेवा. प्रवास शक्यतो टाळा.

वृश्चिक –

धनलक्ष्मीची कृपा राहील. ‘प्रॉपर्टी’च्या कामात यश मिळेल. घरात थोडा वाद होऊ शकतो. जीवनसाथीला नाराज करू नका. नातेवाइकांच्या भेटी होतील. एखाद्या व्यक्तीचे विचार पटणार नाहीत. मात्र, त्याच्याशी कठोर शब्दांत संभाषण करु नका.

धनू-

आर्थिक आवक व्यवसायात सामान्य स्थिती राहील. नोकरीत कामाचा ताण राहील. आरोग्याची काळजी घ्या. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळणे आवश्यक आहे. हितशत्रू डोके वर काढील. मात्र, त्यांच्यावर लक्ष केंद्रित करू नका.

हेही वाचा  राशिभविष्य 21 मे 2022

मकर-

चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही. धनलाभ होईल. मात्र, तेवढाच खर्च कराल. मुलांच्या अडचणी समजून घ्या. त्यांना योग्य मार्गदर्शन करा. काहींना प्रवास करावा लागेल. प्रवासात सतर्कता बाळगली पाहिजे. व्यवसायात सामान्य स्थिती राहील,

कुंभ-

आर्थिक आवक चांगली राहील. विविध सरकारी कामे मार्गी लागतील. घरी पाव्हण्यारावळ्यांचे आगमन होईल. नोकरीत बदली होऊ शकते. कायद्याची बंधने पाळा. रागावर नियंत्रण ठेवा. विविध प्रकारचा लाभ होईल.

मीन-

नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. अधिकारी, सहकारी यांची मदत मिळेल. सुखसोयी मिळतील. योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. व्यवसायात विक्री चांगली होईल. मात्र, मोठी गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला घ्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments