पुण्यातील बालेवाडीतून अपहरण झालेला स्वर्णव चव्हाण या चार वर्षीय मुलाचा अखेऱ शोध लागला आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याबाबत अधिक माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
पुण्यातील डॉ. सतीश चव्हाण यांच्या स्वर्णव (डुग्गु) या चार वर्षीय मुलाचं बालेवाडीमधून आठवडाभरापूर्वी अपहरण झालं होते. त्यानंतर त्याचा जवळपास ३०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकरी सर्वत्र शोध घेत होते. अखेर आज दुपारच्या सुमारास वाकड जवळील पुनावळे येथे स्वर्णव सापडला. कोणी अपहरण केलं? का केलं? याबाबत मात्र अजून माहिती मिळू शकली नाही. पुणे पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.