अफगाणिस्तानच्या पश्चिमेला असलेल्या बदगिस प्रांतात सोमवारी दुपारी भूकंपाच्या दोन धक्क्यांनी तुर्कमेनिस्तानला लागून असलेला सीमावर्ती भाग हादरला. यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे एका स्थानिक अधिकाऱ्याने ही माहिती दिली. भूकंपग्रस्त दुर्गम गावांमध्ये अजूनही मदत आणि बचावकार्य सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
प्रांताच्या संस्कृती आणि माहिती विभागाचे प्रमुख बास मोहम्मद सरवरी यांनी सांगितलं की, भूकंपामुळे झालेल्या विध्वंसात अनेक घरे कोसळली आहेत. यूएस भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, स्थानिक वेळेनुसार दुपारी दोनच्या सुमारास ५.३ रिश्टर स्केलचा पहिला भूकंपाचा धक्का बसला, तर ४.९ रिश्टर स्केलचा दुसरा भूकंप दुपारी चारच्या सुमारास जाणवला.
पेशावर, मानशेरा, बालाकोट आणि चारसदासह खैबर-पख्तूनख्वामधील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, सुदैवाने भूकंपामुळे कोणतीही हानी झाली नाही.