देशातील प्रसिद्ध कथ्थक नर्तक (Kathak Maestro) आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते पंडित बिरजू महाराज (Pandit Birju Maharaj) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. रविवारी मध्यरात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. महाराजांच्या निधनाची माहिती त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
प्रसिद्ध नर्तक बिरजू महाराज यांचा जन्म १९३८ मध्ये लखनऊत झाला होता. लखनऊ घराण्याचे असलेल्या बिरजू महाराज यांचं आधीचं नाव पंडित ब्रिजमोहन मिश्रा असं होतं. कथ्थकसह ते शास्त्रीय गायनसुद्धा करत होते. बिरजू महाराज यांचे वडील आणि गुरु अच्छन महाराज, काका शंभु महाराज आणि लच्छू महाराज हे सुद्धा कथकचे प्रसिद्ध नर्तक होते.