Tuesday, May 24, 2022
Homeट्रेंडिंगमराठी पाट्या लावून मराठी तरुणांना नोकऱ्या देणार का ? इम्तियाज जलील यांचा...

मराठी पाट्या लावून मराठी तरुणांना नोकऱ्या देणार का ? इम्तियाज जलील यांचा राज्य सरकारला प्रश्न

असे का होते की जेव्हा-जेव्हा निवडणुकाजवळ येतात तेव्हा तुम्ही मराठी बोर्ड, कर्नाटक सीमा विवाद, मराठी अस्मिता इत्यादींबद्दल बोलतात. लोक मुर्ख नाहीत की त्यांना या नौटंकी समजत नाही. मराठी पाट्या लावून मराठी तरुणांना नोकऱ्या देणार का? हा एक मिलियन डाॅलरचा प्रश्न आहे, अशी खोचक टीका औरंगाबादचे खासदार तथा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकरवर केली आहे.

हेही वाचा  Nawab Malik:'मलिकांचे डी-गँगशी संबंध' मलिकांनी मनी लाँड्रिंग केल्याचं कोर्टाचं निरीक्षण


बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने सर्व दुकानांच्या पाट्या मराठीत लावणे बंधनकारक असल्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियम) अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. यावर जलील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पुढे ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, तथाकथित धर्मनिरपेक्ष सरकार महाराष्ट्र वक्फ बोर्ड आणि योजनांना मदत देण्याचा निर्णय घेऊ शकते का? किंवा अल्पसंख्यांक आणि विशेषतः मुस्लिमांना त्या बदल्यात काहीही न मिळता फक्त मते द्यायची आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments