Tuesday, May 24, 2022
Homeब्रेकिंगआता राज्यातील सर्व दुकानांवर झळकणार फक्त मराठी पाट्या; राज्य सरकारचा मोठा निर्णय

आता राज्यातील सर्व दुकानांवर झळकणार फक्त मराठी पाट्या; राज्य सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्तींचे विनियमन) अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील सर्व छोट्या-मोठ्या दुकानावरील पाट्या मराठी भाषेतून ठेवाव्या लागणार आहेत. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी यासाठी पुढाकार घेतला.

हेही वाचा  शिवसेनेच्या नेतृत्त्वात संभाजीनगरात पाण्याचा सत्यानाश, फडणवीसांचा घणाघाती आरोप

दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम २०१७ हा अधिनियम लागू होतो. त्यामुळे दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या असून त्यावर उपाययोजना करण्याचीही सातत्याने मागणीही होत होती. याबाबत राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी मंत्रालयात संबंधितांची बैठक घेतली व कायदा सुधारण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा  शिवसेना धक्कातंत्राच्या तयारीत, कोल्हापूरच्या कट्टर शिवसैनिकाचं नाव चर्चेत, संभाजीराजेंना शह?

त्यानुसार आज महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला बहुसंख्य दुकाने व व्यापारी पेठ्यांमध्ये दहापेक्षा कमी कामगार असतात, हे लक्षात घेता यापुढे रस्त्यालगतच्या सर्वच दुकानावरील पाठ्या मराठीतच लावाव्या लागणार आहेत. तसेच मराठीत देवनागरी लिपीतील अक्षरे दुसऱ्या इंग्रजी किंवा अन्य लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशी दुरुस्ती मंजूर करण्यात आली.

हेही वाचा  Breaking News: छत्रपती संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांसोबतची भेट केली रद्द
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments